शिक्रापुरात किराणा दुकानाचा पत्रा उचकटून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:11 IST2021-09-24T04:11:34+5:302021-09-24T04:11:34+5:30

शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात वैभव भुजबळ यांचे किराणा दुकान आहे. मंगळवारी (दि २१) भुजबळ हे दुकान बंद करून ...

Theft of a grocery store in Shikrapur | शिक्रापुरात किराणा दुकानाचा पत्रा उचकटून चोरी

शिक्रापुरात किराणा दुकानाचा पत्रा उचकटून चोरी

शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात वैभव भुजबळ यांचे किराणा दुकान आहे. मंगळवारी (दि २१) भुजबळ हे दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी ते दुकानात आले असताना त्यांना दुकानाचे पत्रे उचकटले असल्याचे दिसले. त्यांनी दुकानाची तसेच दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, रात्री २.३० च्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील काही रोख रक्कम व सिगारेट चोरून नेल्याचे समोर आले. याबाबत वैभव लालचंद भुजबळ (वय २४, रा. करंजेनगर शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र बनकर हे करत आहे.

Web Title: Theft of a grocery store in Shikrapur