पीएमपीची चाके फिरू लागली उलटी! प्रवासी अन् उत्पन्नही घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:04 IST2024-12-16T13:03:47+5:302024-12-16T13:04:38+5:30

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २३ कोटी ४० लाखांची घसरण

The wheels of PMP started turning in reverse Passengers and income also decreased | पीएमपीची चाके फिरू लागली उलटी! प्रवासी अन् उत्पन्नही घटले

पीएमपीची चाके फिरू लागली उलटी! प्रवासी अन् उत्पन्नही घटले

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) उत्पन्न आणि प्रवासी संख्येत यंदा गतवर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे. नोव्हेंबरअखेर २३ कोटी ४० लाख इतके उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी यंदा संचलन तूट वाढण्याची शक्यता आहे.

पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत प्रवासी सेवा दिली जाते. दैनंदिन १९४५ बसमधून दिवसाला ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये पीएमपीच्या स्वमालकीच्या १००४ आणि खासगी ९४१ बस धावतात. यातून दैनंदिन एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळते; परंतु हे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पीएमपीचे आर्थिक घट जास्त होत आहे.

पीएमपी प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी अनेक उपाययोजना करत आहेत. उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे; परंतु मागील दोन अध्यक्षांनी उत्पन्नवाढीसाठी प्रत्यक्ष मार्गावर फिरून आढावा घेत तोट्यात असलेले काही मार्ग बंद केले होते. त्याचा परिणाम उत्पन्नवाढीवर झाला होता. तसेच लांब पल्ल्याच्या तोट्यातील मार्ग बंद करून ज्या मार्गांवर जादा उत्पन्न आहे, अशा मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्या. त्याचा फायदा ‘पीएमपीएमएल’ला झाला होता.

पीएमआरडीए हद्दीतील प्रवासाचा फटका

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत १२२ मार्गांवर ५०२ बसद्वारे सेवा दिली जाते. या हद्दीत अनेक लांब पल्ल्याचे मार्ग आहेत. त्यामुळे बस संचलनासाठी पीएमपीला मोठा खर्च येतो. त्यामुळे तत्कालीन ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील मार्ग बंद केले होते; परंतु, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पीएमपी अध्यक्षांची भेट घेऊन संचलन तुटीचे पैसे पीएमपीला ‘पीएमआरडीए’कडून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांना पीएमपीच्या संचालक मंडळातही समाविष्ट करून घेतले. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे.

Web Title: The wheels of PMP started turning in reverse Passengers and income also decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.