लाखभर हॉटेल्स कामगारांवर आली उपाशी राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:02 IST2026-03-18T12:00:49+5:302026-03-18T12:02:03+5:30

गॅसटंचाईने बेकारीची कुऱ्हाड, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील २२ हजारांहून हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, कोरोनातून सावरण्याआधीच नवे संकट  

The time has come for lakhs of hotel workers to go hungry | लाखभर हॉटेल्स कामगारांवर आली उपाशी राहण्याची वेळ

लाखभर हॉटेल्स कामगारांवर आली उपाशी राहण्याची वेळ

पुणे : अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाची मोठी झळ संपूर्ण जगाला बसत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांच्या हद्दीतील २२ हजारांपेक्षा अधिक हॉटेल्समधील लाखभर कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोना काळात होती तीच वेळ त्यातून अजूनही सावरणाऱ्या या गरीब कामगारांवर आली आहे. मालक व कामगार दोघेही संकटात सापडले आहेत. 

सरकारने घरगुती गॅस सिलिंडर वाचवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वापरावर प्रतिबंध आणले आहेत. व्यावसायिक गॅसच्या टाक्यांचे वितरण जवळपास बंदच ठेवले आहे. त्यामुळे हे संकट निर्माण झाले आहे. 

युद्ध आणखी लांबले तर हे संकट जास्त तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. आताच काही हॉटेल बंद झाली आहेत, तर काहींनी मेन्यू कार्डवरचे पदार्थ कमी केले. लाकडाचा वापर करून चुलीवर होतील असेच पदार्थ ठेवणे सुरू केले आहेत. बहुतेकांनी कामगार कमी करण्यावर भर दिला आहे. आहे त्या कामगारांचे पगारही काही टक्क्यांनी कमी केले आहेत.  

मालक एका महिन्याचे वेतन देऊ शकतात   
पुणे हॉटेल, रेस्टॉरंट व केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले की, हॉटेल बंद ठेवावे लागले तर मालक वर्ग फार तर एखादा महिना कामगारांचे वेतन देऊ शकतो. त्यानंतर मात्र त्यालाही सहन होणार नाही.
कोरोना काळात मालकांनी हा अनुभव घेतला आहे. त्यावेळी संकटाचा सामना वेतन कमी करून, त्यानंतर बंद करून व नंतरच्या काळात काही प्रमाणात पार्सल सेवा सुरू ठेवून करता आला, आता मात्र गॅसच नसेल तर कोणताही पदार्थ करणे अशक्य आहे.       

युद्धाचे परिणाम आपल्यावरही होणार याची सरकारने जाणीवच ठेवली नाही. त्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारनेही हा विषय लक्षात घेत काही उपाययोजना करण्याची गरज होती, त्या झाल्या नाहीत.  
सुनील शिंदे, अध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस. 

कोरोना काळात या कामगारांचे झालेले हाल अजूनही ताजे आहेत, तोच त्यांच्यावर पुन्हा तशीच वेळ आली आहे. कुक वगैरे वगळता बहुसंख्य हॉटेल कामगारांना काम असेल तर पैसे,  अशीच स्थिती असते. 
अजित अभ्यंकर, कामगार नेते.

Web Title : युद्ध और गैस की कमी से होटल कर्मचारियों की आजीविका खतरे में

Web Summary : युद्ध के कारण गैस की कमी से पुणे का होटल उद्योग संकट में है। हजारों होटल प्रभावित हैं, जिससे एक लाख कर्मचारियों की नौकरी खतरे में है। मेनू में कटौती और वेतन में कमी आम है, स्थिति बिगड़ने पर होटल बंद होने का डर है। सरकार से हस्तक्षेप का आग्रह किया गया है।

Web Title : War, Gas Shortage Threaten Livelihoods of Hotel Workers

Web Summary : Pune's hotel industry faces crisis due to war-related gas shortages. Thousands of hotels are affected, endangering jobs for a lakh workers. Reduced menus and pay cuts are common, with fears of closures looming if the situation worsens. Government intervention is urged.