शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

Pune: ‘डीजे’चा दणदणाट त्रासदायकच ठरला, पुणेकरांची प्रतिक्रिया; यंदा १०० पेक्षा जास्त डेसिबलची नोंद

By श्रीकिशन काळे | Updated: September 18, 2024 19:45 IST

अनेक मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली असून कर्णकर्कश बरोबरच जोरदार दणके स्पिकरमधून बसत होते

पुणे: गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा कमी आवाजाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी लक्ष्मी रोडवर १०१.२ डेसिबल आवाजाची पातळी होती, तर यंदा ती कमी होऊन ९४.८ डेसिबल नोंदवली गेली. पण तरी देखील लोकांना जो काही आवाज कानी पडला, तो त्रासदायकच ठरला, अशा प्रतिक्रिया काही पुणेकरांनी दिल्या. मंगळवारच्या रात्रीपेक्षाही बुधवारच्या सकाळी सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. दुपारी १२ वाजता तर बेलबाग व होळकर चौकात ११८.५ डेसिबलची नोंद झाली आहे.

गेल्या २४-२५ वर्षांपासून ‘सीओइपी’ तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे लक्ष्मी रोडवरील प्रमुख दहा चौकांमध्ये ध्वनी पातळीची नोंद होते. ही नोंद सीओइपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यामध्ये इरा कुलकर्णी, मेहर रघाटाटे, मृणाल खुटेमाटे, ईशिता हुम्नाबादकर, आयुष लोहकरे, आदित्य फाळके, आदित्य संजीवी, तेजस जोशी, मोहित कंडाळकर आदींनी सहभाग नोंदवला. शास्त्रीय पद्धतीने ही नोंद झाली. लक्ष्मी रोडवर २४ तासांतील १० चौकांमध्ये नाेंद झाली.

चारही रस्त्यांवर डीजेचा दणदणाट 

लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या चारही रस्त्यांवर ढोल ताशा सोबत डीजेचा दणदणाट ऐकण्यास मिळाला. पोलिसांनी आवाजाची मर्यादा सांगितली असूनही मंडळांनी ती ओलांडून स्पीकर लावले होते. कर्णकर्कश आवाजाबरोबच जोरदार दणकेही गाण्यांमधून बसत होते. असंख्य पुणेकरांनी डीजेच्या दणदणाटावर नाराजी व्यक्त केली असून त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  

आठ वाजल्यावर दणदणाट !

पोलिस आणि प्रशासनाने पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत केवळ मर्यादित डीजे वादनाला परवानगी दिली आणि अधिकाधिक पारंपरिक वाद्यांच्या गजरात लक्ष्मी रोडवर आली. परंतु, सकाळी ८ वाजल्यानंतर मात्र अनेक मंडळांनी दणदणाट सुरू केला. रात्रीपेक्षा बुधवारी (दि.१८) सकाळचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला.

गेल्या काही वर्षांतील आवाज

२०१० : १००.९२०११ : ८७.४

२०१२ : १०४.२२०१३ : १०९.३

२०१४ : ९६.३२०१५ : ९६.६

२०१६ : ९२.६२०१७ : ९०.९

२०१८ : ९०.४२०१९ : ८६.२

२०२० : ५९.८२०२१ : ५९.८

२०२२ : १०५.२२०२३ : १०१.२

२०२४ : ९४.८

ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याचा पर्यावरणसंवेदी कार्याचा यंदा रौप्यमहोत्सव आहे. आम्ही २००१ पासून हे कार्य करतोय. लक्ष्मी रोडवरील प्रत्येक चौकातील आवाज आम्ही नोंदवतो. यंदा ध्वनी पातळी किती असेल, याची उत्सुकता होती. गेल्या वर्षी तुलनेत ती कमीच नोंदली गेली. - डॉ. महेश शिंदीकर, विभाग प्रमुख, उपयोजित विज्ञान व मानव्यविद्या विभाग, सीओईपी

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ध्वनी प्रदूषणाची नोंद केली. गतवर्षीपेक्षा ती कमीच नोंदली गेली. शिवाजीनगर ८५.६, सातारा रोड ८२.७, सारसबाग ८८.९, हडपसर ८२.४, विश्रांतवाडी ८१.३ डेसिबलची नोंद पहायला मिळाली. - जय शंकर सांळुखे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024musicसंगीतSocialसामाजिकHealthआरोग्यPoliceपोलिस