दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलानेच केला गळा दाबून खून

By भाग्यश्री गिलडा | Updated: May 12, 2023 17:30 IST2023-05-12T17:29:34+5:302023-05-12T17:30:10+5:30

वडील चप्पल शिवण्याचे काम करत होते

The son strangled the father who abused him after drinking alcohol | दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलानेच केला गळा दाबून खून

दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलानेच केला गळा दाबून खून

पुणे: घरी दारु पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या वडीलांशी झालेल्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पत्नीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवी क्षीरसागर असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्यांची पत्नी रेखा रवी क्षीरसागर (वय ४३, रा. घुले पाटील कॉलनी, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती रवी हे चप्पल शिवण्याचे काम करत होते. त्याचा मुलगा ओंकार हा काही काम करत नाही. रवी हे नेहमी दारु पिऊन येऊन शिवीगाळ करीत होते. त्याचा राग येऊन ओंकार याने वडिलांना काठीने मारहाण केली. त्यांचा गळा दाबला. फिर्यादी यांना पती निपचित पडून असल्याचे दिसल्यावर त्यांनी पतीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी ओंकार क्षीरसागर याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The son strangled the father who abused him after drinking alcohol