नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:17 IST2025-10-15T10:17:09+5:302025-10-15T10:17:48+5:30
मला नुसतं मंत्रालयात बसून हे प्रश्न कळत नाही, एखादा राउंड मारला की गोष्टी पाहता येतात, लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक राउंड मारला पाहिजे

नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे
पुणे: पुणे मेट्रोने शनिवार पेठ आणि जंगली महाराज रस्ता यांना जोडणारा पादचारी पूल बांधला आहे. हा पूल पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी पुण्यात आले होते. यावेळी त्या भागातील नागरिकांनी अजित दादांना नदी परिसराबाबत काही तक्रारी केल्या आहेत. हा पूल पाहून झाल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, मेट्रो पूल पाहण्यासाठी मेट्रोने बोलवलं होतं. असंच दुसऱ्या पुलाचं काम सुरु आहे. अधिकारी चांगलं काम केलं असेल तर कौतुक केलं पाहिजे. येथील महिला पुरुषांनी काही गोष्टी सांगितल्या. नदीचा भाग, भटकी कुत्री आणि संभाजी बागेच्या तक्रारी केल्या आहेत. काही गोष्टींच कौतुक केलं. नदीचा भाग चांगला करावा असं त्यांनी सांगितलं. मला नुसतं मंत्रालयात बसून हे प्रश्न कळत नाही. एखादा राउंड मारला की गोष्टी पाहता येतात. लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही एक राउंड मारला पाहिजे. त्यामुळे इथे येऊन सगळी पाहणी केली. इथे आल्याशिवाय प्रश्न कळत नाही. ओपन जिम आणि मुलांना खेळण्याचे स्पॉट केले पाहीजे. ते झालं तर चांगला होईल. मला बारीक बघण्याची सवय आहे. दुसऱ्या पुलाचं काम डिसेंबर पर्यंत होईल. ज्या गोष्टी आढळल्या त्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्या. किरकोळ त्रुटी सांगितल्या आहेत.
ब्रिज उंच करावेत
भिडे पूल फार जुना आहे. मागे पूल पडला होता. त्यावेळी ज्यांच्या परिसरात भिडे पुलासारखे पूल आहेत. त्याच ऑडिट कराव असा सांगण्यात आले होते. ब्रिज उंच केलेत कितीही पाणी आला तर काही त्रास होणार नाही. मागच्या ट्रिप ला खडकवासला पुलाची पाहणी केली त्याबाबत चर्चा केली. त्याचा प्लान काढायला सांगितला आहे. नागरिकांच्या कामाला सरकारी जागा लागली तर अडचण येते पण मार्ग मिळतो.
विरोधकांनी काल निवडणूक आयोगाला मतदार यादीबाबत निवेदन दिले. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, काल माझी चर्चा झाली. त्याच उत्तर दिल आहे. कोणी कोणाला भेटावं हे त्यांनी बघावं. लोकशाहीत सगळ्यांना सगळ अधिकार आहेत. पारदर्शक निवडणूक होण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक होईल. स्वायत्तता आपण निवडणूक आयोगाला दिली आहे.