शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खेडमधील शेतकऱ्यांची व्यथा; तालुक्यात तीन धरणे असूनही पाण्यासाठी कायमच संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 09:37 IST

शासनाने आमच्या जमिनींवर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के लवकरात लवकर कमी करून सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करावे

भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील भामा आसखेड, चासकमान व कळमोडी धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी दिल्या आहेत. मात्र पाण्याचे वितरण करताना तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या पदरी कायमच निराशा येत असल्याचे चित्र आहे. भामा - आसखेड हे धरण खेड तालुक्यात आहे. मात्र त्यातील पाणीसाठा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात आहे. तर चासकमानचे पाणी शिरूरला पाठवले जाते. त्यामुळे 'धरण उशाला अन कोरड घशाला' अशीच परिस्थिती तालुक्यात अनुभवायला मिळत आहे. 

एकीकडे प्रकल्प उभारणीसाठी तालुक्यातील जमिनी संपादित केल्या असताना स्थानिक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी तालुक्यातील धरणांमधील 'पाणी पळवा पळवी' संदर्भात आवाज उठवला. विशेषतः भामा - आसखेड धरण प्रकल्पातील पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या क्षेत्रातील तसेच इतर अधिकारातील सातबारा वरील पुनर्वसन शिक्के / शेरे उठविण्याबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाप्रसंगी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तालुक्यातील नाणेकरवाडी, गोणवडी, रासे, कडाचीवाडी, खराबवाडी, चाकण, काळुस, मेदनकरवाडी आदि १८ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केलेल्या केल्या आहेत. संपादित केलेल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर शासनाने पुनर्वसनचे शिक्के टाकले आहेत. मात्र  भामा आसखेड व चासकमान धरणातील पाण्याचा काही गावांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. भु - संपादन कार्यवाही करताना मौजे काळुस येथील उपरोक्त क्षेत्र हे चासकमान प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राबाहेर येत आहे. चासकमान प्रकल्पातंर्गत उजवा कालवा सुरू होऊन सुमारे ३० वर्षे झाली आहेत. तर भामा आसखेड प्रकल्प सुरू होऊन वीस वर्षे झाली आहेत. मात्र काळुस गावच्या शेतजमीनींला या दोन्हीही सिंचनाचा लाभ मिळत नसून गावातील क्षेत्र लाभक्षेत्राबाहेर आहे. काळूस गावाप्रमाणेच भामा आसखेड लाभक्षेत्रातील इतर गावांची हीच गत आहे. त्यामुळे ''धरणाला जमीन दिली आम्ही अन्‌ आम्हीच उपाशी; मात्र भलतेच तुपाशी'' अशी बिकट अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करण्याची मागणी

मुंबईत शेतकऱ्यांनी केले उपोषण... भुमाफीया दलाल, महसुल अधिकारी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पिळवणुक करून लुटमार करत आहेत. याविरोधात काळूस गावातील शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी मुंबईत उपोषण केले आहे. शासनाने आमच्या जमिनींवर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के लवकरात लवकर कमी करून सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

शासन स्तरावर कार्यवाही 

खेड तालुक्यातील भामा - आसखेड  प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात दिली आहे. 

पाणी मिळवून देण्यासाठी राजकारणाचा त्याग करू          खेड तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्याच्या पठार भागात देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र कळमोडी धरणाच्या पुनर्वसनात आंबेगावची किंचितही जमीन नाही. योगदान नाही मग लाभ कसा ? खेडच्या कळमोडी किंवा चासकमान धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी राजकारणाचा त्याग करू. मात्र मागे हटणार नाही.- दिलीप मोहिते - पाटील, आमदार खेड तालुका.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीKhedखेडRainपाऊसAlandiआळंदीDamधरण