शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 20:16 IST

उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे कालच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. लाखो वारकऱ्यांना घेऊन माऊली विठुरायाच्या भेटीला निघाले. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी माऊलींच्या पालखी सोहळयात सहभागी झाले आहेत. पुणेकर आतुरतेने वाट पाहत असताना आज सायंकाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले.

सर्वत्र माऊलींचा जयघोष, टाळ - मृदंगाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी पालखीचे दर्शन घेतले. यंदा प्रशासनाकडून वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. स्वच्छतेबरोबरच, सर्व सुविधा महापालिकेकडून पुरवण्यात आल्या आहेत. तसेच माऊलींच्या स्वागतासाठी रस्त्यावर नयनरम्य रांगोळी काढण्यात आली आहे. दुकानदार, व्यापारी वर्ग, नागरिक यांच्याकडून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले आहे. उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. पुणेकरांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी उद्याचा पूर्ण दिवस मिळणार आहे.        आळंदीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भल्या सकाळीच वारीची वाट चालू लागला. इंद्रायणी ओलांडून देहूफाट्यावरून रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास शहरात आगमन झाले. वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात विसावा झाला. त्यानंतर दिघीच्या मॅक्झिन चौकात स्वागत केले. वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर सोहळा विश्रांतवाडी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला. मार्गावर वारकऱ्यांना अन्नदान, चहा नास्ता वाटप करण्यात आले. दर्शनासाठी गर्दी लोटली होती. मार्गावर राजकीय नेत्यांचे फ्लेक्स लक्षवेधी होते.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022PandharpurपंढरपूरSocialसामाजिक