Rajgad: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव "राजगड", ऐतिहासिक निर्णयाला महसूल विभागाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:14 IST2025-08-21T11:14:24+5:302025-08-21T11:14:32+5:30
Velhe Taluka Renamed Rajgad: वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता दिली

Rajgad: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव "राजगड", ऐतिहासिक निर्णयाला महसूल विभागाची मान्यता
पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव " राजगड " करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. लवकरच राजपत्र जारी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णयाला मान्यता दिली आहे. वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता दिली. विशेष म्हणजे या नावाचे ऐतिहासिक महत्त्व, वेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारने मान्यता देण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.
वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर आता राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.