शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

घड्याळाचे गूढ उकलले;  प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात नेमकं कसं केलं स्टिंग ऑपरेशन?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 11:58 IST

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात लावलेल्या घड्याळामध्ये स्पाय कॅमेरा बसवून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

पुणे : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना आपण कोणतेही घड्याळ भेट दिले नसून, त्यांनी अकारण आपल्यावर आरोप केला आहे. स्टिंग ऑपरेशनमुळे प्रवीण चव्हाण यांचा काळा चेहरा समोर आल्याचे तेजस मोरे यांनी सांगितले.

आपल्या कार्यालयात तेजस मोरे याने भेट दिलेल्या घड्याळात स्पाय कॅमेरा बसविला होता, त्यातून हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. यावर तेजस मोरे यांनी बाजू मांडली. मोरे म्हणाले की, ॲड. चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ अथवा छुपा कॅमेरा बसविला नाही. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावेत.

ॲड. चव्हाण यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत तेजस मोरे यांनी सांगितले की, मी सुरुवातीला त्यांना देव मानत होतो. मी पाच महिने तुरुंगात होतो. त्यांनी जामिनावर माझी सुटका केली. त्यांच्या कार्यालयात असताना एकदा त्यांच्या इंग्रजी ग्रामरमधील काही चुका मी दुरुस्त केल्या होत्या. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यांतील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करून देत होतो. अनेकांचे जबाब मी नोंद केले आहेत. मला कायद्याचे ज्ञान नसल्याने असे जबाब तयार करून देण्याचे सरकारी वकिलाचे कामच आहे, असा माझा समज होता.

भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे पेरले-

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाबदेखील मी तयार केले. ९ जानेवारी रोजी पुणेपोलिसांनी भोईटे व इतरांच्या जळगावमधील घरी छापे घातले. पुणे पोलिसांनी भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट केले होते. तेव्हापासून मी ॲड. चव्हाण यांच्यापासून दूर गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. 

गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे यांनी सांगितल्याचे चव्हाण सांगत होते. मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस मोरे यांनी दिली आहे.

...आणि घड्याळाचे गूढ उकलले 

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात लावलेल्या घड्याळामध्ये स्पाय कॅमेरा बसवून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. हे स्टिंग ऑपरेशन कसे करण्यात आले, याविषयी अनेक तर्क केले जात होते. पण, हे गूढ आता उकलले आहे.

हे घड्याळ लावल्यानंतर काही दिवसांनी बंद पडले. चाचू नावाची व्यक्ती घड्याळ दुरुस्त करते, असे सांगून घेऊन जात, पुन्हा आणून बसवत असे. असे दोन-तीन वेळा झाले. एकदा तो घड्याळ घेऊन आलेला सीसीटीव्हीमध्ये दिसून येतो. मात्र, त्याला काहीतरी संशय आल्याने बहुधा तो परत निघून गेला. त्यानंतर त्याने परत कधी घड्याळ आणून बसविले नाही. घड्याळ दुरुस्त करण्याच्या नावाखाली त्यातील स्काय कॅमेऱ्यातून हा सर्व डाटा काढून घेण्यात येत होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणेPoliceपोलिस