Suicide: अभ्यासासाठी मुलाला का मारते? पती रागावल्याच्या कारणावरून विवाहितेने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 19:24 IST2022-02-13T19:23:58+5:302022-02-13T19:24:09+5:30

मुलगा अभ्यास करत नसल्यामुळे पत्नी त्याला मारहाण करत असल्याचे पतीला दिसून आले

The married woman suicide in bhigwan because her husband was angry | Suicide: अभ्यासासाठी मुलाला का मारते? पती रागावल्याच्या कारणावरून विवाहितेने घेतला गळफास

Suicide: अभ्यासासाठी मुलाला का मारते? पती रागावल्याच्या कारणावरून विवाहितेने घेतला गळफास

भिगवण : मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणातून विवाहितेने गळफास लावीत जीव दिल्याची घटना भिगवण येथे घडली. रोहिणी राकेश थोरात (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत राकेश थोरात यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी सकाळी राकेश थोरात कामावरून घरी आलेले असताना पत्नी रोहिणी मुलाचा अभ्यास घेत होती. तर मुलगा राघव हा अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी त्याला हाताने मारहाण करत होती. यावेळी राकेशने रोहिणीला 'तु अभ्यासासाठी मुलाला का मारते त्याचा अभ्यास तो करेल' असे म्हणत तिच्या हातातून मुलाला सोडवत आपल्या जवळ घेतले. यावेळी चिडलेल्या रोहिणी हिने आता याचा अभ्यास तुम्हीच घ्या असे रागाने म्हणत घरात जावून दरवाजा बंद केला. बराच वेळ होऊनही दरवाजा न उघडल्याने मनात शंका निर्माण झाल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहिणी हिने घराच्या छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी राकेश याने रोहिणीला खाली घेत शेजाऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर विवाहितेला मृत घोषित केले.

Web Title: The married woman suicide in bhigwan because her husband was angry