एकाच ओढणीला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; वाघोलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:26 AM2023-10-31T09:26:25+5:302023-10-31T09:26:34+5:30

प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलिसांनी वर्तविला

The lovers ended their lives by hanging themselves from the same rope; Incidents in Wagholi | एकाच ओढणीला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; वाघोलीतील घटना

एकाच ओढणीला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; वाघोलीतील घटना

वाघोली : वाघोली येथील लॉजमधील खोलीत एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा. चंदननगर, खराडी, पुणे), सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा. खराडी. नेहरु कॉलनी, भिंगार,अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते लॉजमध्ये दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. सहा वाजून गेल्यानंतरही त्यांनी खोली न सोडल्याने लॉजच्या कामगारांनी तरुणाच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र त्याने कॉल रिसिव्ह केला नाही. यामुळे हॉटेलचे कर्मचारी खोलीजवळ गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. मात्र दरवाजा उघडाच होता. कर्मचाऱ्याने तो ढकलला असता त्यांनी ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलिसांनी वर्तविला आहे. कोमल ही डीएम एलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन हा खासगी नोकरीला होता. अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक पोलिस निरीक्षक सूरज राजगुरू करत आहेत.

Web Title: The lovers ended their lives by hanging themselves from the same rope; Incidents in Wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.