इन्स्टाग्रामवर झालेली ओळख तरुणीला पडली महागात; अपहरण करून नेले गुजरातला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 09:55 IST2022-10-22T09:50:46+5:302022-10-22T09:55:02+5:30

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....

The introduction on Instagram cost the young woman dearly; Kidnapped and taken to Gujarat | इन्स्टाग्रामवर झालेली ओळख तरुणीला पडली महागात; अपहरण करून नेले गुजरातला

इन्स्टाग्रामवर झालेली ओळख तरुणीला पडली महागात; अपहरण करून नेले गुजरातला

पुणे :इन्स्टाग्रामवर झालेली ओळख तरुणीला चांगलीच महागात पडली. एकाने सोशल मीडियाच्या ओळखीतून तरुणीचे अपहरण करून तिला गुजरात येथे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून डांबून ठेवले. गुजरात येथून आरोपीच्या तावडीतून सुटका केल्यानंतर तिने थेट येरवडा पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिल्यानंतर एकावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाकीर इस्माईल झवेरीवाला (वय ३५, रा. गुजरात) याच्यावर गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. पीडित महिला मूळची नेपाळ येथील रहिवासी असून सध्या ती पुण्यातील ढोले पाटील रोड येथे राहते. नोव्हेंबर २०२१ दरम्यान तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गुजरात येथील झाकीर याच्याशी झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवून पहिले लग्न झाले असताना तिला लग्नाची मागणी घातली. लैंगिक अत्याचार केले. त्याने तिला गुजरात येथे नेले. तेथे दुसरे लग्न झाल्याचे समजले. त्याने तिला गुजरात येथील घरात डांबून ठेवून ॲसिड फेकून जिवे मारण्याची धमकी दिली.

याच दरम्यान झाकीर हा त्याच्या पहिल्या पत्नीला भेटायला गेल्यानंतर तरुणीने डांबून ठेवलेल्या ठिकाणाहून स्वतःची सुटका करून पुणे गाठले. पुणे गाठल्यानंतर तिला झाकीर याने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तू कोठेही गेली तरी मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून तिने थेट येरवडा पोलीस ठाणे गाठून अत्याचाराची कहाणी पोलिसांसमोर कथन केली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The introduction on Instagram cost the young woman dearly; Kidnapped and taken to Gujarat