Ramzan Eid: अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात; घरोघरी आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:12 IST2026-02-19T10:12:02+5:302026-02-19T10:12:40+5:30

रमजान निमित्ताने मुस्लीम समाजबांधवांमध्ये उत्साह, आनंद पाहायला मिळत असून आजपासून महिनाभर रमजानचे रोजे (उपवास) ठेवले जाणार आहेत.

The holy month of Ramadan begins today; there is an atmosphere of joy and excitement in every household | Ramzan Eid: अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात; घरोघरी आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण

Ramzan Eid: अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात; घरोघरी आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण

पुणे: शहरासह देशभरातील मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला बुधवारी (दि.१८) सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यामुळे रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१९) पहिला रोजा (उपवास) होणार आहे. हिलाल सिरत कमिटी (चाँद कमिटी) पुणेची बैठक बुधवारी रविवार पेठेतील सिरत कमिटीच्या कार्यालयात सायंकाळी ७ वाजता आयोजित केली होती. त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. रमजाननिमित्त तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवार पेठ, कॅम्प परिसर, रविवार पेठ, कोंढवा आदी ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यासही सुरुवात झाली आहे. रमजाननिमित्त घरोघरी आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

चाँद कमिटीच्या बैठकीला मौलाना हाफीज ऐहतेशाम, मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन, मौलाना गुलाम अहमद खान, मौलाना जमीरुद्दीन, मौलाना खालीद निजामी, मौलाना ऐजाज, सय्यद अ. माजीद, कारी अब्दुल माजीद, रफीउद्दीन शेख उपस्थित होते. मुस्लीम धर्मीयांमध्ये रमजानच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे. मनातील कटुता विसरून परस्परांमध्ये आपुलकी, स्नेहभाव, संयम, त्याग, शांती, सहिष्णुता वाढावी, याची शिकवण देणारा हा महिना आहे. संपूर्ण महिनाभर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कडकडीत रोजे, पाचवेळा नियमितपणे नमाजपठण केले जाते. रमजानचा पवित्र महिना सुरू होणार असल्याने घरोघरीही तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने सामूहिक नमाजपठणही होणार आहे. तसेच, मशिदींमध्येही तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने मुस्लीम समाजबांधवांमध्ये उत्साह, आनंद पाहायला मिळत आहे. गुरुवारपासून महिनाभर रमजानचे रोजे (उपवास) ठेवले जाणार आहेत.

इस्लाम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लीम बांधव पहाटेच्या सहरपासून सूर्यास्तापर्यंत रोजा (उपवास) पाळतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी अजाननंतर इफ्तार करून रोजा सोडला जातो. या काळात नमाज, कुरआन पठण, दानधर्म आणि आत्मचिंतनाला विशेष महत्त्व दिले जाते.

रमजान हा संयम, त्याग, शिस्त आणि मानवतेचा संदेश देणारा महिना मानला जातो. गरीब आणि गरजूंची मदत करणे, जकात देणे आणि सामाजिक सलोखा जपणे यावर विशेष भर दिला जातो. शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाज आणि तरावीहची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title : रमज़ान की शुरुआत: उपवास, प्रार्थना और सामुदायिक भावना का महीना शुरू

Web Summary : चाँद दिखने के साथ रमज़ान शुरू। मुस्लिम उपवास रखते हैं, नमाज़ अदा करते हैं। विशेष प्रार्थनाओं, दावतों और दान से सामुदायिक भावना बढ़ती है। बाज़ार उत्सव के भोजन से गुलज़ार हैं।

Web Title : Ramzan Begins: Month of Fasting, Prayer, and Community Spirit Starts

Web Summary : Ramzan begins as moon sighted. Muslims observe fasts, offer prayers. Community spirit thrives with special prayers, feasts, and charity. Markets buzz with festive food.