पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून

By श्रीकिशन काळे | Updated: December 27, 2024 14:16 IST2024-12-27T14:11:37+5:302024-12-27T14:16:24+5:30

महाअंतिम फेरीत पाच विभागातील 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

The grand finale of the Purushottam Trophy tournament begins today | पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे गुरूवारी (दि. 26) लॉटस्‌‍ काढण्यात आले असून महाअंतिम फेरीला आजपासून (दि. 27) सुरुवात होत आहे. महाअंतिम फेरीत पाच विभागातील 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

दि. 27 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका :
वेळ : सकाळी 9 वाजता
म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पुणे (बस नं. 1532)
न्यू आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर (देखावा)

वेळ : सायंकाळी 5 वाजता
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन)
संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन)
सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (रंगवास्तू)

दि. 28 रोजी सादर होणाऱ्या एकाकिका
वेळ : सकाळी 9 वाजता
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)
फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा)
सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त)
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान)

वेळ : सायंकाळी 4 वाजता
शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम 375)
आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर 1)
राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?)
सरस्वती भुवन आर्टस्‌‍ ॲण्ड कॉमर्स कॉलेज, छत्रपती संभाजीनगर (शहाजी)
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय)

दि. 29 रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी 9 वाजता


देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर (फाटा)
म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा)
प्रादर्शिक कला विभाग -1 (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन)
विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी)

Web Title: The grand finale of the Purushottam Trophy tournament begins today