बत्तीस वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:46 IST2023-03-26T13:46:18+5:302023-03-26T13:46:44+5:30
तीन - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू

बत्तीस वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; खेड तालुक्यातील घटना
शेलपिंपळगाव : रासे (ता. खेड) येथील एका बत्तीस वर्षीय तरुणाने झाडाला दोर अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी सकाळी कडाचीवाडी गावच्या हद्दीत घडली. नवनाथ दत्तात्रय वाडेकर (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.
मागील तीन - चार दिवसांपासून नवनाथ हे बेपत्ता झाले होते. त्याबाबत पोलिसात फिर्याद दिली होती. शनिवारी सकाळी कडाचीवाडी गावच्या हद्दीतील एका दुकानासमोरील झाडाला दोरी अडकवून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्याच परिसरात पाच -सहा वर्षांपूर्वी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तो वाचला होता.