हॉटेल कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; लोणी काळभोरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:18 IST2024-05-01T16:18:02+5:302024-05-01T16:18:35+5:30

कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट

The extreme step taken by the hotel employee Incidents in Loni Kalbhor | हॉटेल कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; लोणी काळभोरमधील घटना

हॉटेल कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; लोणी काळभोरमधील घटना

लोणी काळभोर (पुणे): हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातील बोरकर मळा येथे बुधवारी (दि. १) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. शंकर मोहनराव शिंदे (वय २७, रा. लोणी काळभोर,  बोरकर मळा , मूळ रा. मुरखेड नागेली, जि. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील राजेंद्र कदम (बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यास माहिती दिली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर शिंदे हे मागील दीड वर्षापासून पुणे - सोलापूर महामार्गवरील एका हॉटेल मध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. ते आपल्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांसह त्या हॉटेलच्या रूममध्ये राहत होते. मंगळवारी (दि. ३०) शिंदे यांच्या मित्राचा वाढदिवस होता. शिंदे हे वाढदिवसाला गेले नाही. त्यांचे सहकारी वाढदिवसाला गेले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. १) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाला गेलेले सहकारी परतले. त्यांनी दरवाजा ठोठावला परंतु, कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता शंकर शिंदे हे दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. शंकर शिंदे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.

Web Title: The extreme step taken by the hotel employee Incidents in Loni Kalbhor