आयटी इंजिनिअर तरुणीवर बॉसने केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 15:54 IST2022-03-04T15:54:24+5:302022-03-04T15:54:32+5:30

पुणे : अहमदाबाद येथून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या बॉसने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार ...

The company boss raped a young IT engineer who came to Pune from Ahmedabad for a job | आयटी इंजिनिअर तरुणीवर बॉसने केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

आयटी इंजिनिअर तरुणीवर बॉसने केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : अहमदाबाद येथून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या बॉसने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अहमदाबाद येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२० ते जून २०२१ दरम्यान घडला.

राहुल कुमार सिंह (वय ३७, रा. खराडी) आणि मालव आचार्य (रा. अहमदाबाद) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आयटी इंजिनिअर आहे. आरोपी राहुलकुमार हा खराडी येथील एका कंपनीत व्यवस्थापक आहे. वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याने तिच्याशी संपर्क वाढविला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याबरोबर लग्न करतो, असे आश्वासन तिला दिले. त्यानंतर मांजरी, खराडी येथील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सदर तरुणीने राहुल कुमारला लग्नाबाबत विचारणा केली. परंतु, त्याने फिर्यादीच्या आणि त्याच्या सामायिक मित्राच्या मदतीने कंपनीत तसेच राहत्या ठिकाणी तिची बदनामी केली. तसेच तिला पुन्हा अहमदाबादला जाण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तू जर पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर बलात्कार करण्यास सांगेन, तुझा अपघात घडवून आणेन, ते तुला समजणारही नाही, अशी धमकी दिली. त्याने मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोसावी तपास करीत आहेत.

 

Web Title: The company boss raped a young IT engineer who came to Pune from Ahmedabad for a job