Maharashtra Winter: राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार

By श्रीकिशन काळे | Updated: January 3, 2025 20:14 IST2025-01-03T20:14:40+5:302025-01-03T20:14:51+5:30

राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला

The cold weather which has disappeared for 2 weeks will return to the maharashtra state | Maharashtra Winter: राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार

Maharashtra Winter: राज्यात २ आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरु होणार

पुणे : गेल्या दोन आठवड्यापासून गायब झालेली थंडी शुक्रवारपासून (दि.३) पुन्हा जाणवू लागली आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान १० अंशावर आले असून, पुण्यात ११.७ अंश नोंदले गेले. येत्या दोन दिवसांत राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदियात ८.८ अंशावर नोंदले गेले.

राज्यात विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. सध्या उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका कमी जास्त होत आहे. दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी कमाल तापमान कायम दिसत असून, उत्तर भारतातील तापमानात घट होऊ शकते. राज्यामध्ये काही ठिकाणी सकाळी धुक्याची चादर पहायला मिळत आहे. तसेच शुक्रवारी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत होता. राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात आणखी ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील किमान तापमान

पुणे : ११.७
नगर : १०.४
कोल्हापूर : १६.५
महाबळेश्वर : १२.८
नाशिक : ११.३
सातारा : १४.६
मुंबई : २१.५
धाराशिव : १३.०
बीड : १०.९
नागपूर : ९.०
गोंदिया : ८.८

Web Title: The cold weather which has disappeared for 2 weeks will return to the maharashtra state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.