दरोड्याची तयारी करत असलेल्या कात्रजच्या 'चुहा टोळी'च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 10:20 IST2022-07-27T10:19:55+5:302022-07-27T10:20:01+5:30

टोळीचा प्रमुख चुहावर तब्बल १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल....

The 'Chuha Toli' police of Katraj, who were preparing for the robbery, smiled | दरोड्याची तयारी करत असलेल्या कात्रजच्या 'चुहा टोळी'च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरोड्याची तयारी करत असलेल्या कात्रजच्या 'चुहा टोळी'च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धनकवडी (पुणे) :भारती विद्यापीठपोलिसांनी चुहा गँगच्या म्होरक्यासह त्याच्या टोळीस जेरबंद केले असून या टोळीचा प्रमुख चुहावर तब्बल १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल अहेत.

चुहा टोळीचा मुख्य सूत्रधार तौसिफ ऊर्फ चुहा हा त्याच्या साथीदारांसह सच्चाई माता डोंगरावर कात्रज येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर भारती विद्यापीठपोलिसांना मिळाली होती. खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व धीरज गुप्ता तपास पथकासह तेथे पोहोचले.

यावेळी चुहा टोळी तेथे घोळका करून बसली होते. यावेळी तौसिफ ऊर्फ चुहा जमिर सय्यद (रा. कात्रज), अझरुद्दीन दिलावर शेख ( वय २२, रा. कात्रज), ईशान निसार शेख (वय २०, रा. कात्रज), गणेश विजय भंडलकर (वय २१, रा. कात्रज) व कैफ आरीफ शेख (वय १८, रा. कात्रज) यांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी त्यांच्याजवळून दोन कोयते, मिरचीपूड, लोखंडी रॉड, मोबाइल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदर आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुध्द पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांनी फिर्याद दिली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करत आहेत.

Web Title: The 'Chuha Toli' police of Katraj, who were preparing for the robbery, smiled