शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार, सुट्टीच्या दिवशी उमेदवारांचा जोरदार प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:02 IST

विधानसभा निवडणुकीने वातावरण निघाले ढवळून : मागील २० दिवस झाडल्या गेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधून शहरातील सर्वच उमेदवारांनी रविवारी (दि. १७) जोरदार प्रचार केला. ढोल-ताशांचा गजर, समर्थकांसह काढलेल्या रॅली, पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जाेरदार रंगला होता.विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. या निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी हाेता. मतदान बुधवारी (दि. २०) होणार असल्याने, प्रचाराचा शेवट सोमवारी सायंकाळी हाेणार आहे. मागील २० दिवसांत प्रचारसभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच रविवार सुटीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायांना भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला. दारोदारी जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांपर्यंत स्वतःचे नाव, निवडणूक चिन्ह पोहोचवले. यामुळे रविवारी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले हाेते. दिग्गजांनी लावली हजेरी  कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्यात दुहेरी लढत आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह अन्य नेतेमंडळींनी हजेरी लावत, याच उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले. महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, सी. टी. रवी यांनी हजेरी लावत विविध भागांत रॅली आणि सभेत सहभाग नोंदवला. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे शरद पवार, काँग्रेसचे नेते इम्रान प्रताप गढी, बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, राजेश लीलोठिया, खासदार संजय राऊत, वंदना चव्हाण, के. जे. जॉर्ज यांनी हजेरी लावली.प्रचारासाठी स्टार मैदानात हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, महायुतीचे चेतन तुपे, मनसेचे साईनाथ बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोड शो झाला. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचाही मेळावा झाला. अभिनेते भाऊ कदम हेदेखील प्रचारात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली. मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारात माजी आमदार महादेव बाबर सक्रियपणे सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार