डोक्याची बाजू ठेचून, हात पाय बांधून मृतदेह टाकला वरंधा घाटात; पोलिसांनी २ राक्षसांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:46 IST2025-04-28T12:45:44+5:302025-04-28T12:46:21+5:30
दोन आरोपींना ताब्यात घेतल्यावर तपास केला असता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणांवरून तरुणाचा खून केल्याची कबुली दिली

डोक्याची बाजू ठेचून, हात पाय बांधून मृतदेह टाकला वरंधा घाटात; पोलिसांनी २ राक्षसांना घेतले ताब्यात
खानापूर : जुन्या भांडण्याचा कारणावरून खून वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) हद्दीत डोक्याची बाजू ठेचून व हात पाय बांधलेल्या अनोळखी मृत्यू सापडल्या असल्याचे आढळून आल्यावर भोर पोलिसांनी गुन्हाचा तपास तत्काळ आरोपी अटक केली. पुढील तपास भोर पोलिस करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी पोलिसपाटील सुधीर दिघे यांनी केलेल्या तक्रारीवरून शिरगाव (ता. भोर) हात पाय बांधलेले व डोक्याची बाजू ठेचून डोकं व तोंड नाहीसे केली. अनोळखी मृत्यदेह सापडला असताना पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी तपास यादी तयार करून शोध घेण्यास सुरुवात केली. मृत्यू झालेल्याचे नाव संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (वय ४०, रा. सोनल हाइटस् बी विंग प्लॅट नं. ०४ वडगाव बुद्रूक, ता. हवेली) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण विभागाने संतोष भिकू पिसाळ (वय ४२, रा. साई प्लॅनेट बिल्डिंग प्लॅट न.२०४ वडगाव बुद्रूक ता. हवेली), अनिकेत चंद्रकांत पिसाळ, (वय २९ रा. वेताळनगर अनंत सृष्टी बिल्डिंग, प्लॅट नं.४०३ आंबेगाव खुर्द ता. हवेली, दोघे ही मूळ रा. रांजे, ता. भोर) यांना ताब्यात घेतले आहे. तपास केला असता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रमोद पासलकर यांचा खून केला असल्याचा गुन्हा कबूल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक आण्णा पवार हे करीत आहेत.