पुण्यातील कात्रज घाटात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:26 IST2022-04-14T14:25:51+5:302022-04-14T14:26:04+5:30
दुचाकीच्या नंबर वरुन मृत व्यक्ती वानवडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यातील कात्रज घाटात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह
धनकवडी : कात्रज बोगदा परिसरातील दरीमध्ये एका तरुणाचा दुचाकीसह मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी खबर मिळताच दुचाकीसह मृतदेह बाहेर काढला. हा अपघात आहे की घातपात याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दरम्यान दुचाकीच्या नंबर वरुन मृत व्यक्ती वानवडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रज घाट परिसरातील दरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीतून जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह जळालेल्या अवस्थेतील होता. त्याच्या जवळ ओळख पटेल असे काहीही नव्हते. दरम्यान त्याच्या दुचाकीच्या नंबरवरुन शोध घेतला असता तो वानवडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तो दोन दिवसांपुर्वीच रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे सांगितले. यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.