स्वप्नातील सफर घडविणारी बच्चे कंपनीची लाडकी ‘फुलराणी’ झाली सत्तरीची; सारसबाग पेशवे पार्क उद्यानातील फुलराणीचा आज वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:18 IST2026-04-08T11:17:53+5:302026-04-08T11:18:16+5:30

८ एप्रिल १९५३ रोजी सुरू झालेल्या पेशवे पार्कातील हिरवळीतून, बोगद्यातून आणि वळणावळणाने जाणारी ही फुलराणी आजही मुलांना त्यांच्या स्वप्नातील सफर घडविते

The beloved 'Phulrani' of the Bachche Company, which creates dream journeys, turns 70; Today is the birthday of Phulrani at Sarasbagh Peshwa Park. | स्वप्नातील सफर घडविणारी बच्चे कंपनीची लाडकी ‘फुलराणी’ झाली सत्तरीची; सारसबाग पेशवे पार्क उद्यानातील फुलराणीचा आज वाढदिवस

स्वप्नातील सफर घडविणारी बच्चे कंपनीची लाडकी ‘फुलराणी’ झाली सत्तरीची; सारसबाग पेशवे पार्क उद्यानातील फुलराणीचा आज वाढदिवस

पुणे: पिढ्यानपिढ्यांचे बालपण समृद्ध करणाऱ्या फुलराणीचा आज, बुधवारी (दि. ८) वाढदिवस आहे. पुण्यातील बच्चेकंपनीची लाडकी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणीतील अविभाज्य भाग असलेली 'फुलराणी' आपल्या प्रवासाचे ७० वे वर्ष पूर्ण करीत आहे. ८ एप्रिल १९५३ रोजी सुरू झालेल्या पेशवे पार्कातील हिरवळीतून, बोगद्यातून आणि वळणावळणाने जाणारी ही फुलराणी आजही मुलांना त्यांच्या स्वप्नातील सफर घडविते. ही चिमुकली रेल्वे आजही तितक्याच उत्साहात सारसबाग पेशवे पार्क उद्यानात जोरदार धावत आहे. पुणे शहर व गावावरून येणारी लहान मुले उन्हाळ्याच्या सुटीत फुलराणीला अधिक पसंती देत असतात. आजही 'छुक छुक' करत धावणारी ही फुलराणी पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग बनली आहे.

सात दशकांचा अविस्मरणीय प्रवास १९५६ च्या साली पुण्याच्या सारसबाग गणपती चरणी येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी तत्कालीन महापालिका प्रशासनाने ही रेल्वे सुरू केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून अशा प्रकारच्या बाल रेल्वे देशात ठिकठिकाणी सुरू झाल्या होत्या. त्यापैकी पुण्यातील ‘फुलराणी’ ही सर्वांत लोकप्रिय ठरली असून, आजही तिचे महत्त्व तेवढेच आहे.

अशा आहेत पुणेकरांच्या भावना

यादिवशी पेशवे पार्कात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक पुणेकर आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या नातवंडांना घेऊन यादिवशी येथे येत असतात. ‘आम्ही लहान असताना ज्या फुलराणीत बसलो होतो, त्याच फुलराणीत आज आमची तिसरी पिढी बसतेय, हे पाहून खूप आनंद होतो,’ अशी भावना ज्येष्ठ पुणेकर नागरिक व्यक्त करतात.

दरवर्षी फुलराणीच्या वाढदिवसाचा केप कापण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असतो. वयाची ८१ वर्षे पार केली तरी आजही फुलराणी विषयीचा उत्साह लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत कायम आहे. वयाच्या ११ वर्षं वडिलांच्याबरोबर हडपसरवरून फुलराणीत बसण्यासाठी येत होतो. आता नातवंडांना घेऊन येत असतो. ही आठवण कायम राहावी यासाठी, या फुलराणीतून लहान मुलांना फिरण्याचा आनंद अधिक घेण्यासाठी अंतर वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. - बी. के रासकर, ज्येष्ठ नागरिक

पुणे महानगरपालिकेतर्फे फुलराणीला फुलांनी सजवण्यात आले असून, या ७० वर्षांच्या प्रवासाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. सकाळी दहा वाजता वाढदिवसाचा केक लहान मुलांच्या हस्ते कापून सुरुवात केली जाणार आहे. मात्र, बुधवारी सुटी असल्याने उद्यान बंद आहे तरी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. - विकास पाठक, उद्यान निरीक्षक पेशवे पार्क.

Web Title : पुणे की प्यारी 'फुलरानी' ट्रेन ने मनाई 70 साल की खुशी।

Web Summary : पुणे की प्रतिष्ठित 'फुलरानी' ट्रेन, जो 1953 से पेशवे पार्क का एक अभिन्न अंग है, 70 साल पूरे कर रही है। पीढ़ियों से बच्चों ने इसकी सवारी का आनंद लिया है, जिससे यह पुणे का एक यादगार स्थल और सांस्कृतिक विरासत बन गई है। ट्रेन अभी भी आगंतुकों को खुश करती है।

Web Title : Pune's beloved 'Phulrani' train celebrates 70 years of childhood joy.

Web Summary : Pune's iconic 'Phulrani' train, a cherished part of Pesve Park since 1953, celebrates 70 years. Generations of children have enjoyed its ride, making it a nostalgic landmark and a cultural heritage of Pune. The train continues to delight visitors.