शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

दहशत माजवित ३ तरुणांवर कोयत्याने हल्ला, आरोपींच्या मुसक्या आवळल्या; गोऱ्हे बुद्रुकमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 19:58 IST

आत्तापर्यंत आठ आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोनजण विधीसंघर्षित आहेत....

- कल्याणराव आवताडे

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा तरुणांनी भर रस्त्यात तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली. या हल्ल्यात नचिकेत संजय जगताप, ऋषिकेश दिलीप जगताप, निलेश हिरामण शहा हे तीन तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत आत्तापर्यंत आठ आरोपींना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील दोनजण विधीसंघर्षित आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गणेश खुडे हा मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना गणेशला नचिकेत जगताप याने अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली होती. याचा राग मनात धरून गणेश याने इतर दहा ते पंधरा जणांना बोलावून घेतले. तसेच गोऱ्हे बुद्रुक येथे जाऊन जगताप व इतर दोन जणांवर हल्ला केला. यात जगताप याच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली.

अवघ्या चोवीस तासांत गणेश राजू खुडे (वय: २४वर्षे, रा. धायरी फाटा, वडगाव खुर्द) सोमनाथ गुलाब पवार (वय:  १९ वर्षे, रा. मारुती मंदिराच्या मागे, धायरी) यश चंद्रकांत जवळकर (वय: १९ वर्षे, रा. खानापूर, ता. हवेली) अनिरुध्द अमित ठाकुर (वय: १९ वर्षे, रा. खडकचौक, धायरी) ओंकार संतोष पोळेकर (वय: १९ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराच्या समोर, धायरी) हमजा कमरअली शेख (वय: २२ वर्षे, रा. जिजाऊ संकुल, भैरवनाथ मंदीर, धायरी) व इतर दोन विधीसंघर्षित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांच्या सूचना व आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलीस हवालदार तोडकर, पोलीस नाईक गायकवाड, धनवे, पोलीस अंमलदार चौधरी, काळे, शिंदे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार करीत आहेत. 

गुंडांना राजाश्रय मिळतोय: सुप्रिया सुळे 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे, याचा हा नमुना आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असून यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र दहशतीखाली जगावे लागत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच, गृहखात्याने या घटनेची तातडीने दखल घेऊन अशा पद्धतीने दहशत माजविणाऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्याची गरज आहे, अशी मागणीही सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. 

फिर्यादी आहेत सराईत गुन्हेगार...

या घटनेतील फिर्यादी जगताप याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी यांच्यावरही पोलिसांकडून मागील गुन्ह्यांबाबत कारवाई होण्याची शक्यता आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडत असेल तर तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी