शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हिणी घाटातील 'तो' भाग अत्यंत तीव्र वळणाचा; संपूर्ण परिसर अपघातप्रवण क्षेत्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:23 IST

पुणे जिल्‍हयाची हद्द संपल्‍यानंतर रायगड जिल्‍हयातील कोंडेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरु होतो. हा अत्‍यंत तीव्र वळणाचा रस्ता आहे

पुणे : पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात ५०० फूट खोल दरीत थार गाडी कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातातील तरुण सर्व पुण्याच्या उत्तमनगर भागातील आहेत. शहाजी चव्हाण (वय २२, रा. कोंढवे धावडे), पुनीत सुधारक शेट्टी (वय २०, रा.कोपरे गाव), साहिल साधू बोटे (वय २४, रा.कोपरे गाव), श्री महादेव कोळी (वय १८, रा.भैरवनाथ नगर), ओंकार सुनील कोळी (वय १८, रा. भैरवनाथ नगर) आणि शिवा अरुण माने (वय १९, भैरवनाथ नगर) अशी त्यांची नावे आहेत.

ताम्हिणी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली. पुणे जिल्‍हयाची हद्द संपल्‍यानंतर रायगड जिल्‍हयातील कोंडेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरु होतो. हा अत्‍यंत तीव्र वळणाचा रस्ता आहे. हा संपुर्ण परिसर अपघात प्रवणक्षेत्र आहे. येथे लोखंडी रेलींग्‍स आहेत. परंतू येथे घाटात जाड भिंतींची उपाययोजना तसेच वेगमर्यादा राखण्‍यासाठी गती नियंत्रक करणे गरजेचे आहे. आजुबाजुला उभी व खोल दरी, घनदाट जंगल असा हा परिसर आहे. वेगात असलेली वाहने वळणावर अनियंत्रीत झाल्‍यास दरीच्‍या बाजूला जातात.

नेमका अपघात घडलं कसा? 

पुण्‍याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्‍हयातील कोंडेथर गावांनतर घाट उतरताना हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घाटाच्या रस्त्यावर पहिल्‍याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्‍याचा अंदाज आहे. भीषण अपघातात या सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. सध्या दरीतून ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इतर दोघांचा शोध अजून सुरु आहे. माणगाव पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तरुणांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटातील दाखवले आहे. दरम्यान, आता शोध मोहिम सुरू करण्यात आली.  

हे सर्व सहा मित्र सोमवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी निघाले. त्‍यानंतर त्‍यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्‍यामुळे पालकांनी उत्‍तमनगर पोलिसांत ते हरवल्‍याची तक्रार दिली. त्‍यानंतर पोलिसांनी सीसीटीव्‍ही फुटेज आणि लोकेशनच्‍या माध्‍यमातून ताम्हिणी घाट परिसरात शोध घेतला. आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी ताम्हिणी घाटात (जि.रायगड) अवघड वळणावर अपघात प्रवण ठिकाणी ड्रोनच्‍या मदतीने शोध घेतला असता दरीत थार मोटार व चार मृतदेह लांबून दिसून आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamhini Ghat Accident: Six Dead as Car Plunges into Valley

Web Summary : Six young men from Pune died in Tamhini Ghat after their car plunged 500 feet into a valley. The accident occurred at a sharp turn in a known accident-prone area. Police are investigating, citing driver error as a possible cause. Search operations are ongoing for remaining victims.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूRaigadरायगडcarकारPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलhighwayमहामार्ग