ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:49 IST2025-11-20T13:48:14+5:302025-11-20T13:49:29+5:30
रायगडच्या ताम्हिणी घाटात थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. थार जीप ५०० फूट दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
मानगाव महामार्गावर ताम्हिणी घाटामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. थार गाडी ५०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहिम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर थार गाडी ५०० फूट खोल तरीत कोसळली. हा अपघात सोमवारी रात्री झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात झाल्याचे तीन दिवसांनी समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तरुणांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटातील दाखवले आहे. दरम्यान, आता शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.