शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

क्लिष्ट प्रक्रियेने ‘रेरा’कडे बांधकाम व्यावसायिकांची पाठ

By admin | Updated: June 14, 2017 04:00 IST

केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीची (रेरा) स्थापना केली आहे. परंतु यासाठी घातलेल्या प्रचंड क्लिष्ट अटीमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीची (रेरा) स्थापना केली आहे. परंतु यासाठी घातलेल्या प्रचंड क्लिष्ट अटीमुळे बांधकाम व्यावसायिकांनी ‘रेरा’च्या नोंदणीकडे पाठ फिरवली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागामध्ये आतापर्यंत बांधकाम व्यावसायिकांची केवळ २३ प्रकल्पांची नोंद केली आहे. तर नोंदणीमध्ये एजंट आघाडीवर असून आतापर्यंत १२४६ एजंट नोंदणीकृत झाले आहेत.बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी रेरा हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी कायदा करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने १ मे पासून त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी सुरु होऊन एक महिना लोटला तरी अद्यापही ‘रेरा’ अंतर्गत नोंदणी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचा अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळालेला नाही. रेरा अतंर्गत नोंदणी केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी स्वतंत्र नोंदणी करून बँकेत खाते उघडाले लागणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून, ही कागदपत्रे मिळविण्यासाठी किमान चार-पाच दिवस लागतात. या सर्व क्लिष्ट अटींमुळे सध्या तरी बांधकाम व्यावसायिकांना रेराकडे पाठ फिरवली आहे. आता पर्यंत विभागात १२४६ एजंडांनी रेरा अतंर्गत नोंदणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.एक महिना झाला तरी बिल्डरांकडून नोंदणीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जनजागृती करण्यासाठी पीएमआरडीएच्या वतीने नुकतीच स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आली. पीएमआरडीएच्या वतीने १५ जूून पासून पाषाण येथील कार्यालयात ‘रेरा’ अतंर्गत नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात येत आहे. - किरण गित्ते, मुख्यकार्यकारी अधिकारी, पीएमआरडीएग्राहकांसोबत करार, खरेदी खत, ताबा कधी देणार, प्लॅन कसा असेल याची माहिती भरावी लागणार आहे. तसेच एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. चुकी माहिती भरली तर मोठ्या रक्कमेचे दंड केले जातील किंवा नोंदणी रद्द होईल.रेरा च्या नोंदणीच्या या क्लिष्ट प्रक्रियेमुळे उशीर होणे सहाजिक आहे. - शांतीलाल कटारिया, अध्यक्ष, महाराष्ट्र के्रडाई