TET exam : टीईटी परीक्षा हाेणार २१ जूनला;असा असेल वेळापत्रक... ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 14:37 IST2026-03-26T14:37:00+5:302026-03-26T14:37:53+5:30

राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले वेळापत्रक; उद्यापासून भरता येणार अर्ज

TET exam will be held on June 21; this will be the schedule | TET exam : टीईटी परीक्षा हाेणार २१ जूनला;असा असेल वेळापत्रक... ​​​​​​​

TET exam : टीईटी परीक्षा हाेणार २१ जूनला;असा असेल वेळापत्रक... ​​​​​​​

पुणे : शिक्षक पात्रतेसाठी बंधनकारक असलेले महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेतली जाईल, असे राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारांना २७ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली. सदर परीक्षा अर्ज इंग्रजी भाषेतच भरावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत ५० हजार उमेदवार पात्र झाले असून, त्यात काही शिक्षकांचाही समावेश आहे. अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य परीक्षा परिषदेने पुढील परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यात अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ९ जून ते २१ जून दरम्यान प्रवेश अर्जाची प्रिंटआऊट उपलब्ध होईल. तसेच २१ जून रोजी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत टीईटी पेपर क्रमांक एक होईल. त्यानंतर पेपर क्रमांक दोन दुपारी अडीच ते पाच दरम्यान हाेईल.

यात उमेदवारांना केवळ ऑनलाइन अर्ज करता येईल. ऑफलाइन अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाइन, बैंकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड आदींद्वारे भरावे लागेल. शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदन पत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही स्वरुपाची दुरुस्ती करता येणार नाही. काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

असा असेल वेळापत्रक...

- ऑनलाइन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी : दि. २७ मार्च ते १६ एप्रिल २०२६

- प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : दि. ०९ जून ते २१ जून २०२६

- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ : रविवार, दि. २१ जून २०२६, वेळ - सकाळी १०:३० ते १३:०० वा.

- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ : रविवार, दि. २१ जून २०२६, वेळ - दुपारी १४:३० ते १७:०० वा.

Web Title : महाराष्ट्र टीईटी परीक्षा 21 जून, 2026 को: शेड्यूल जारी

Web Summary : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 21 जून, 2026 को होगी। ऑनलाइन आवेदन 27 मार्च से 16 अप्रैल तक खुले हैं। प्रवेश पत्र 9 जून से डाउनलोड के लिए उपलब्ध होंगे। परीक्षा में दो पेपर शामिल हैं, जो एक ही दिन आयोजित किए जाएंगे।

Web Title : Maharashtra TET Exam Set for June 21st, 2026: Schedule Released

Web Summary : Maharashtra's Teacher Eligibility Test (TET) will be held on June 21, 2026. Online applications are open from March 27th to April 16th. Admit cards will be available for download from June 9th. The exam includes two papers held on the same day.