दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानाच्या अंतर्गत; ते ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:00 IST2025-04-26T12:58:39+5:302025-04-26T13:00:00+5:30

तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा? ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? प्रकाश आंबेडकरांचे सवाल

Terrorist Bases Inside Pakistan Demolish that training center Prakash Ambedkar's reaction | दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानाच्या अंतर्गत; ते ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानाच्या अंतर्गत; ते ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

पुणे: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ६ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यात पुण्यातील २, पनवेलमधील १ आणि डोंबिवलीतील ३ मावस भावंडांचा समावेश आहे. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. पाकिस्तानसोबतचे पाच करार भारताने रद्द केले आहेत. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुंज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधतं काही सवाल उपस्थित केले आहेत.  जिथे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर आहेत. ते उद्धवस्त करण्यात यावेत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. 

आंबेडकर म्हणाले, झेलम, चिनाब पाणी करार स्थगित करण्याचा सांगितला जात आहे. नद्याच पाणी भारतीय सरकार वापरणार कसं याचा खुलासा केला नाही. त्याची खोली वाढवणार आहोत असं कळलं आहे. त्याच्यापेक्षा अधिल पाणी कस अडवणार? हा सवाल उपस्थित होत आहे. वर्ड बँकेची गॅरंटी आहे. त्याचं परिणाम काय होणार आहे हे केंद्र सरकारने आधी सांगावं असं त्यांनी सरकारला विचारलं आहे. 

सरकारमध्ये निर्णय घेण्याची राजकीय कमतरता

तो सामान्य माणूस हेच विचारतोय की, तुम्ही एवढी हत्यारं विकत घेतली. तुम्ही विमानं विकत घेतली. तुम्ही असताना पाणबुड्या विकत घेतल्या. भारतामध्ये असताना नवीन लढाऊ जहाज तुम्ही निर्माण केलं. त्या सगळ्यांचा उपयोग काय? असा प्रश्न त्याठिकाणी विचारला जातोय. केंद्र सरकारला आवाहन आहे कि, तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा? ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. पण निर्णय घेण्याची राजकीय कमतरता निर्माण झाली आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. सरकारला शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोकं शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील असं आंबेडकरांनी यावेळी सांगितलं आहे.

दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच्या अंतर्गत

दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय देशांन भारताला पाठिंबा दर्शवला आहे. संपूर्ण ठिकाणी भारताच्या बाजूने उभे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरीसुद्धा मग अ असं म्हणताय की, कारवाई होत नाही. म्हणजे नक्की काय युद्धासारखी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? माझं नेहमी म्हणणं असतं. युद्ध नाही जिथे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर आहेत. ते उद्धवस्त करण्यात यावेत. ते उद्धवस्त करत नसतील तर तुम्ही उध्वस्त करा. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत. मग अशा वेळी तुम्हाला ते काय करतात? याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? हे पहिल्यांदा विचार होणं महत्वाचं आहे.

सरकारने पर्यटकांना बाहेर काढलं ही चूक केली
 
धर्म विचारून गोळी मारली यावर काही होय म्हणतात काही नाही म्हणतात. मात्र इथे मध्यम आणि राजकीय नेते नरेटीव सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत. ख्रिशन , मुस्लिम पण मारले गेलेत. सर्वपक्षीय बैठकीत जर पंतप्रधान जात नाहीत. म्हणजे किती सीरियस आहेत हे लक्षात येत. पंतप्रधानांनी त्यांना ब्रिफिंग करणे गरजेच होते. मी जर बैठकीत असतो तर वॉक आउट केलं असतं. सरकारने पर्यटकांना बाहेर काढलं ही चूक केली. खर तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता. पर्यटकांच्या मनात भीती नव्हती त्यांना सुरक्षा मिळणार की नाही हा प्रश्न होता. सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता.

Web Title: Terrorist Bases Inside Pakistan Demolish that training center Prakash Ambedkar's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.