Accident: पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात; वाळूचा ट्रक कारवर झाला पलटी, कारचा चुराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 14:36 IST2021-12-24T14:31:47+5:302021-12-24T14:36:27+5:30

कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून रस्त्यावर पूर्णपणे वाळू पसरली

Terrible accident on Pune nagar road The sand truck overturned on the car | Accident: पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात; वाळूचा ट्रक कारवर झाला पलटी, कारचा चुराडा

Accident: पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात; वाळूचा ट्रक कारवर झाला पलटी, कारचा चुराडा

पुणे : पुणे नगर रस्त्यावर भीषण अपघात झाला असून वाळूचा ट्रक थेट कारवर पलटी झाला आहे. कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून रस्त्यावर पूर्णपणे वाळू पसरली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून पोलीस ते हटवण्याचे काम करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या एका गल्लीतून चारचाकी बाहेर येत होती. त्यावेळी नगर रस्त्यावरून येणारा वाळूने भरलेला डंपर आला. तो वळण घेत असताना चालकाला नियंत्रण न राहिल्याने गल्लीतून येणाऱ्या चारचाकीवर पडला. अनियंत्रित झालेला ट्रक येताना पाहून चारचाकीतील नागरिक तातडीने बाहेर पडले, यामध्ये ते किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांची सांगितले आहे. पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत. 

Web Title: Terrible accident on Pune nagar road The sand truck overturned on the car