भाडेकरूचा घरमालकाच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विमानतळ पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:14 IST2023-04-18T15:14:01+5:302023-04-18T15:14:18+5:30
पोलिसांनी २० वर्षांच्या भाडेकरूला अटक केली...

भाडेकरूचा घरमालकाच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विमानतळ पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे : आई-वडील परगावी गेले असताना भाडेकरूने जिवे मारण्याची धमकी देत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी २० वर्षांच्या भाडेकरूला अटक केली आहे.
या प्रकरणी एका ३२ वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादींकडे भाड्याने राहतो. ५ एप्रिल रोजी त्या बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीच्या बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देत घराच्या बाल्कनीतून आत प्रवेश केला.
दोघा मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर दोघींना मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती. घाबरल्यामुळे मुलींनी हा प्रकार घरच्यांना सुरुवातीला सांगितला नव्हता. मुलींनी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.