शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

धुमाळ, चौधरी यांची तात्पुरती हकालपट्टी

By admin | Updated: July 1, 2015 03:48 IST

नगर जिल्ह्यातील शिक्षकाला महापालिकेच्या शिक्षण मंडळात बदली करून देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेले

पुणे : नगर जिल्ह्यातील शिक्षकाला महापालिकेच्या शिक्षण मंडळात बदली करून देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांची राष्ट्रवादीकडून तात्पुरत्या स्वरूपात हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाचा राजीनामा देण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम या वेळी उपस्थित होत्या. नगर जिल्ह्यातील एका शिक्षकाला शिक्षण मंडळात जिल्हाबाह्य बदली करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण मंडळातील लिपिक संतोष मेमाणे, बाबा धुमाळ, रवींद्र चौधरी यांच्यासह आणखी एका मध्यस्थावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर मागील आठवड्यात या दोघांचीही २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार, या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण म्हणाल्या, ‘‘या दोन्ही सदस्यांनी या प्रकरणाबाबत आपल्याकडे खुलासा केलेला आहे. या प्रकरणांमध्ये आपल्याला गोवण्यात आल्याचे सांगितले आहे. या सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय त्यांच्यावर दाखल करण्यात येणाऱ्या आरोपपत्रातील माहितीवरून घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, अद्याप हे आरोपपत्र मिळाले नसल्याने या दोन्ही सदस्यांचे तात्पुरते निलंबन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आरोपपत्र मिळाल्यानंतर कायमस्वरूपी निलंबनाचा निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी धुमाळ यांनी आपल्याला पत्र लिहून यात आपला दोष नसून आपल्याला गुंतविण्याचा प्रकार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात घेऊन कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून हा तात्पुरता निलंंबनाचा निर्णय घेतला आहे.मंडळाच्या राजीनाम्याचे काय ?-या दोन्ही सदस्यांचे निलंबन केले असल्याने त्यांचा शि़क्षण मंडळाचा राजीनामा घेणार का, याबाबत विचारणा केली असता, त्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले. याबाबतचा निर्णयही आरोपपत्र पाहिल्यानंतरच घेतला जाईल. त्यांना वाटत असेल आणि त्यांनी राजीनामा दिला, तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाल्या. त्यामुळे पक्षाकडून केवळ तात्पुरत्या निलंबनाची कारवाई दाखवून या प्रकरणी या दोघानांही पाठीशी घालण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा महापालिकेत आहे.पाठराखण करणेपक्षाची जबाबदारी-लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी नसून, कोणीतरी हेतुपुरस्सर आम्हाला या प्रकरणात गुंतवले आहे़, अशी भूमिका बाबा धूमाळ व रवी चौधरी यांनी पक्षाकडे मांडली आहे़ जर कोणावर अन्याय होत असेल, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे ही पक्षाची जबाबदारीच आहे असे वंदना चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.