खेड तालुका: घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:49 IST2025-03-28T16:48:03+5:302025-03-28T16:49:01+5:30

घोटवडी धामणगाव दरम्यान घाटामध्ये टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून तो पलटी झाला, त्यावेळी टेम्पोच्या टपावर बसलेले १०, १५ जण खाली पडले

Tempo carrying bulls overturns at the ghat between Ghotwadi and Dhamangaon; One dead, 8 injured | खेड तालुका: घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

खेड तालुका: घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

पुणे: खेड तालुक्यात ढाकाळे येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. घाटातून बैल घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात होऊन एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले आहेत. कोंडू सतू बांगर वय (५५ ) असे त्या तरुणाचे नाव आहे. तर जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, ढाकाळे येथील बैलगाडा शर्यतीसाठी घोटवडी येथील गबाजी पारधी हे बैल घेऊन टेम्पोमधून बैल घेऊन जात होते. यावेळी घोटवडी धामणगाव दरम्यान घाटामध्ये टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून तो पलटी झाला. त्यावेळी टेम्पोच्या टपावर बसलेले १०, १५ जण खाली पडले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

Web Title: Tempo carrying bulls overturns at the ghat between Ghotwadi and Dhamangaon; One dead, 8 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.