शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

टेमघर धरणाची गळती आटोक्यात : यंदाच्या हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 9:13 PM

टेमघर धरणातील भेगा बुजविण्याचे (ग्राऊटींग) बहुतांश काम पूर्ण झाल्याने गळती ९० टक्के आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन वर्षांनी धरणात शंभरटक्के पाणी साठा करण्यात येणार आहे.

पुणे : टेमघर धरणातील भेगा बुजविण्याचे (ग्राऊटींग) बहुतांश काम पूर्ण झाल्याने गळती ९० टक्के आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा दोन वर्षांनी धरणात शंभरटक्के पाणी साठा करण्यात येणार आहे. धरणाच्या सांध्यातून काही प्रमाणात गळती होत असली तरी, ती काळजी करण्यासारखी नाही. पुढील वर्षी (जून २०२०) संपूर्ण काम होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली. मुळशी तालुक्यातील मुठा गावाजवळ मुठा नदीवर हे धरण बांधले आहे. २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. तर, २०११ पासून पूर्ण क्षमतेने पाणी साठविले जात आहे. या धरणाची साठवण क्षमता पावणेचार अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. पुणे शहराची साडेतीन महिन्यांची तहान यात भागू शकते. दोन वर्षांच्या खंडानंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविणार असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर सर्व प्रथम प्रसिद्ध झाले होते. या धरणाच्या कामाची माहिती देण्यासाठी जलसंपदा विभागाने मंगळवारी (दि. १६) धरणाचा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यात जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या भेगा बुजविण्याचे आणि धरणाला मजबुती आणण्याचे काम सुरु आहे. गेल्या वर्षी धरणात क्षमतेच्या निम्मा साठा करण्यात आला होता. कामासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच धरण रिकामे करण्यात आले होते. ग्राऊटींड (भेगा बुजविणे) व पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉर्र्टफिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पॉलिफायबर तंत्रज्ञानाने करण्यात येणारे मजबुतीचे काम १० टक्के झाले आहे. भेगा बुजविण्याचे मुख्य काम बहुतांश प्रमाणात झाले असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येईल. पुढील वर्षी मॉन्सून पूर्वी उरलेले कामही होईल. तसेच, देखभाल दुरुस्तीचे हे काम पुढील ५० वर्षे टिकेल, असे कार्यकारीय अभियंता एस. व्ही. प्रदक्षणे म्हणाले.काय आहे ग्राऊटींग  धरणातील भेगा बुजविण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटमधे प्लाय अ‍ॅश, सिलिका, प्लॅस्टीसायझर आणि या सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा वापर केला जातो. उच्चदाबाने हे मिश्रण भेगांमधे भरले जाते. या मुळे गळती थांबते. केंद्रीय पॉवर अ‍ॅण्ड रिसर्च स्टेशन आणि जलसंपदा विभााने या कामाचा आरखडा बनिवला असून, त्याच्या चाचण्या देखील घेतल्या आहेत. पॉलिफायबर तंत्रज्ञानाने होणार हा फायदापॉलिफायबर रिइन्फोर्समेंट तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉँक्रीटमधे पॉलिप्रोपेलिन फायबर वापरले जाते. भिंतीला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. भविष्यात ती छिद्रे मोठी होऊन गळतीचा धोका वाढतो. त्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करुन लहान छिद्रे बुजविली जातात. त्यामुळे धरणाच्या मजबुतीमधे वाढ होते. या तंत्रज्ञानाचा देशात प्रथमच वापर येथे करण्यात येत आहे. टेमघर धरणातून होत होती ३३पट अधिक गळती दुरुस्तीचे काम होण्यापूर्वी टेमघर धरणामधून सेकंदाला तब्बल अडीच हजार लिटर पाण्याची गळती होत होती. धरणातील गळतीचे हे प्रमाण तब्बल तेहतीसपट अधिक होते. प्रत्येक धरणातून पाझर अथवा गळती काही प्रमाणात होतच असते. धरणाचा प्रकार, लांबी, उंची आणि पाणी साठविण्याची क्षमता या नुसार गळतीचे सामान्य प्रमाण किती असते, हे ठरविले जाते. या नुसार टेमघरमधे ७५ लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती, सामान्य ठरते. त्या पेक्षा ही गळती कितीतरी अधिक होती. आत्ता झालेल्या ग्राऊटींगच्या कामानंतर ही गळती दोनशे लिटर प्रतिसेकंद पर्यंत कमी होईल, असा अंदाज आहे. संपूर्ण काम झाल्यानंतर गळती ७५ लिटर प्रतिसेकंदच्या मर्यादेत येईल.धरणातून होणारी गळती वर्ष - गळतीचे प्रमाण २००९- प्रति सेकंद ५०८ लिटर २०१६ - प्रति सेकंद २ हजार ५८७ लिटर २०१७- प्रति सेकंद १ हजार ३९ लिटर २०१८- प्रति सेंकद ४१३ लिटर असे आहे टेमघर धरणधरणाचा प्रकार दगडीधरणाची लांबी १०७५ मीटरधरणाची अधिकतम उंची ८६.६५ मीटरपाणीसाठवण क्षमता ३.८१ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा ३.७० टीएमसीपाणी वापर शहराला पिण्यासाठीसिंचन मुळशी तालुक्यातील १ हजार हेक्टर   

टॅग्स :DamधरणWaterपाणी