शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘टेमघर’ करणार डिसेंबरपर्यंत रिकामे ; दुसऱ्या टप्प्यातील कामास जानेवारी-२०२० पासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 11:55 IST

धरणाच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात दोन वर्षांनी धरणात शंभर टक्के (३.७१ टीएमसी) पाणीसाठा करण्यात आला आहे...

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्याचे काम जानेवारीपासून : काम पूर्ण होण्यास लागणार वर्षअवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर

पुणे : टेमधर धरणाला मजबुती देण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास जानेवारी-२०२० पासून सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागेल, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या कामासाठी ५० कोटी रुपये मंजूर असून, त्यापैकी ३८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत.  मुळशी तालुक्यातील मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आले असून, २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. अवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले. धरणाला धोका पोहचतो की, काय असाही प्रश्न उपस्थित केला होता. धरणाच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केल्यानंतर यंदाच्या पावसाळ्यात दोन वर्षांनी धरणात शंभर टक्के (३.७१ टीएमसी) पाणीसाठा करण्यात आला आहे. येत्या डिसेंबर अखेरीपर्यंत धरण पूर्ण रिकामे करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु होईल. सध्या धरणात २.७१ टीएमसी (७३.१९ टक्के) पाणीसाठा आहे. ग्राऊटिंग (भेगा बुजविणे) व पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉटक्रिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पॉलिफायबर तंत्रज्ञानाने करण्यात येणारे मजबुतीचे काम १० टक्के झाले आहे. दुरुस्तीचे काम होण्यापूर्वी टेमघर धरणामधून सेकंदाला तब्बल अडीच हजार लिटर पाण्याची गळती होत होती. धरणाचा प्रकार, लांबी, उंची व पाणी साठविण्याची क्षमता या नुसार गळतीचे सामान्य प्रमाण किती असते, हे ठरविले जाते. यानुसार टेमघरमधे ७५ लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती, सामान्य ठरते, त्यापेक्षा ही गळती कितीतरीपट अधिक होती. ...धरणातील गळतीचे प्रमाण खाली आले पहिल्या टप्प्यात केलेल्या कामामुळे धरणातील गळतीचे प्रमाण अडीचशे लिटर प्रतिसेकंदपर्यंत खाली आली आहे. उर्वरीत काम झाल्यानंतर गळती संपूर्ण आटोक्यात येईल. ........पावसाळ्याचे दिवस वगळून काम सुरू राहील. संपूर्ण काम पूर्ण होण्यास डिसेंबर-२०२० उजाडेल, अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊस