धक्कादायक! पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षिकेचा १७ वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:40 IST2024-12-29T15:35:27+5:302024-12-29T15:40:39+5:30

शाळेच्या स्टाफ रूम मध्येच घडला प्रकार

Teacher sexually abused students for 17 years at a renowned school in Pune | धक्कादायक! पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षिकेचा १७ वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! पुण्यातील नामांकित शाळेत शिक्षिकेचा १७ वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

किरण शिंदे

ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी असते, ज्ञानार्जनाची जबाबदारी असते त्या शिक्षिकेनेच शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आणि हा संपूर्ण प्रकार शाळेतीलच स्टाफ रूम मध्ये घडला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ७, ९ (फ), ११, ६, १२, १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मध्यवर्ती परिसरात इंग्रजी माध्यमाची ही नामांकित शाळा आहे. पीडित १७ वर्षे विद्यार्थी हा या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी शिक्षिका ही देखील त्याच शाळेत आहे. २७ डिसेंबर रोजी पीडित विद्यार्थी हा दहावीची पूर्व परीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता. यावेळी आरोपी शिक्षिकेने त्याला प्रेमाची भुरळ पाडली आणि शारीरिक संबंधासाठी प्रोत्साहित करून उत्तेजित केले. त्यानंतर शाळेतीलच स्टाफ रूममध्ये घेऊन जात आपल्या शारीरिक सुखासाठी त्याचा वापर केला. 

दरम्यान, शाळेतील स्टाफ रूम मध्ये सुरू असलेल्या या कृत्याची भनक शाळेच्या मुख्याध्यापिकेला लागली. त्यांनी त्यांनी स्टाफ रूममध्ये येऊन पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना दिली. मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकेला अटकही केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या शिक्षिकेची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: Teacher sexually abused students for 17 years at a renowned school in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.