बिबट्याने केले शेळ्यांना लक्ष्य

By Admin | Updated: June 24, 2015 05:11 IST2015-06-24T05:11:08+5:302015-06-24T05:11:08+5:30

इनामगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालला असून बिबट्याकडून शेळ्या फस्त करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Targeted by leopard goats | बिबट्याने केले शेळ्यांना लक्ष्य

बिबट्याने केले शेळ्यांना लक्ष्य

शिरसगाव काटा : इनामगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढत चालला असून बिबट्याकडून शेळ्या फस्त करण्याचे प्रमाण वाढले आहे.
इनामगांव परिसरात बागायती क्षेत्र जास्त असल्याने उसाचे पीक मोठ्याप्रमाणावर घेतले जाते.
या भागात बिबट्याचा वावर वाढत असून गेल्या पंधरा दिवसांत परिसरातील पाच ते सहा नागरीकांच्या शेळ्या बिबट्याकडून फस्त करण्यात आल्या आहेत़
या पूर्वी येथील दर्यापट व इनामगांवच्या वेगवेगळ्या भागात शेळ्या खाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये
भितीचे वातावरण असून
वनविभागाने तातडीने दखल घेऊन पिंजरा लावावा, अशी मागणी श्रीगोंदा साखर कारखान्याचे
संचालक श्रीनिवास घाडगे यांनी
केली आहे.

Web Title: Targeted by leopard goats