पुण्यातील कर्वेनगर परिसरात नळाला मैलमिश्रित पाणी; हा आमच्या जिवाशी खेळ नाही का? नागरिकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:41 IST2026-01-19T13:41:13+5:302026-01-19T13:41:42+5:30

काही नागरिकांनी पाणी उकळून वापरण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागले.

Tap water mixed with talcum powder in Pune's Karvenagar area; Isn't this playing with our lives? Citizens' question | पुण्यातील कर्वेनगर परिसरात नळाला मैलमिश्रित पाणी; हा आमच्या जिवाशी खेळ नाही का? नागरिकांचा सवाल

पुण्यातील कर्वेनगर परिसरात नळाला मैलमिश्रित पाणी; हा आमच्या जिवाशी खेळ नाही का? नागरिकांचा सवाल

कोथरूड : कर्वेनगर येथील गायकवाड चाळ व परिसरात रविवार (दि.१८) सकाळपासून नळाद्वारे काळे व मैलमिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सकाळी नेहमीप्रमाणे पाणी भरताना पाण्याचा रंग काळसर असून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पुणे महापालिकेकडे तक्रारी केल्या. मात्र, दुपारपर्यंतही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना पाणी वापरणे टाळावे लागले.

या पाण्याचा वापर केल्यास जुलाब, उलटी, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही नागरिकांनी पाणी उकळून वापरण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागले.

पाणीपुरवठा वाहिनीत गळती होऊन सांडपाणी मिसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळपासून आमच्या घरात नळाला अक्षरशः मैलामिश्रित काळे पाणी येत आहे. हे पाणी पाहूनच घृणा वाटते. अशा परिस्थितीत पाणी वापरणं तर दूरच, घरात लहान मुलं आणि महिलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.- नितीन गायकवाड, स्थानिक नागरिक

आज सकाळी नळाला घाण पाणी आले होते. ड्रेनेज भरलेले होते. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सकाळपासून या समस्येवर काम सुरू आहे. लवकरात लवकर समस्याचे निराकरण करून नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी प्रयत्न करू. - अपर्णा देसाई, पाणीपुरवठा विभाग, कर्वेनगर, पुणे महापालिका

नागरिकांचे महापालिकेला प्रश्न

- मलमिश्रित पाणी येईपर्यंत पुणे महापालिका काय करते?
- हा नागरिकांच्या जिवाशी खेळ नाही का? 
- केवळ स्वच्छतेच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्ष जमिनीवर इतका निष्काळजीपणा कसा चालतो? 
- पुणेकरांचा जीव इतका स्वस्त आहे का?

Web Title : पुणे के कर्वे नगर में दूषित पानी की आपूर्ति से आक्रोश

Web Summary : कर्वे नगर के निवासी सीवेज से दूषित पानी मिलने से नाराज हैं। बच्चों और बुजुर्गों के लिए संभावित स्वास्थ्य जोखिमों के बारे में चिंताएं बढ़ रही हैं। नागरिकों ने पुणे नगर निगम से स्वच्छ पानी की आपूर्ति बहाल करने और लापरवाही को दूर करने के लिए तत्काल कार्रवाई की मांग की है।

Web Title : Contaminated Water Supply in Pune's Karve Nagar Sparks Outrage

Web Summary : Karve Nagar residents are furious after receiving sewage-contaminated water. Concerns rise about potential health risks, especially for children and the elderly. Citizens demand immediate action from Pune Municipal Corporation to restore clean water supply and address negligence.