Tanushree Datta did not come before the women's commission: Vijaya Rahatkar | तनुश्री दत्ता महिला आयोगासमोर आल्याच नाहीत : विजया रहाटकर
तनुश्री दत्ता महिला आयोगासमोर आल्याच नाहीत : विजया रहाटकर

ठळक मुद्देतनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी राजकीय दबाव वापरुन क्लिन चिट मिळविल्याचा केला आरोप

पुणे :अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आमच्याकडे नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेवून आम्ही नाना पाटेकर यांना नोटीस पाठविली. त्यावर त्यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरणही पाठविले होते. मात्र त्यानंतर दत्ता यांनी महिला आयोगासमोर येणे गरजेचे होते. मात्र, त्या अजूनही महिला आयोगाकडे आल्याच नाहीत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. 
तनुश्री दत्ता यांनी मी टू प्रकरणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आक्षेप नोंदविले होते. याच विषयावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
   अभिनेत्री तनुश्री दत्ता मिटू प्रकरणी पाटेकर यांच्यावर आरोप केल्याने मोठ्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त केले होते. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता

. त्यानंतर सिनेसृष्टी मधील अनेकांवर अशाच प्रकारे मीटू अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. दत्ता आणि पाटेकर यांच्या प्रकरणावर काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष असताना पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी राजकीय दबाव वापरुन क्लिन चिट मिळविल्याचा आरोप केला.त्यावरही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
या विषयावर रहाटकर म्हणाल्या की, 'अन्याय झालेल्या प्रत्येक महिलेला  पूर्ण न्याय देण्याचा महिला आयोगाचा प्रयत्न असतो.तनुश्री यांच्या सोबतही झालेल्या त्या प्रकाराची माहिती जाणून घ्यायची होती. मात्र दत्ता आयोगासमोर हजर झाल्या नाहीत'.

Web Title: Tanushree Datta did not come before the women's commission: Vijaya Rahatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.