एटीएममध्ये छेडछाड; दोघांनी एकापाठोपाठ २५ वेळा ट्रान्झेक्शन करत काढले ५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 18:49 IST2021-03-25T18:47:46+5:302021-03-25T18:49:06+5:30

फर्ग्युसन रस्त्यावरील घटना...

Tampering with ATMs; The two person stolen 5 lakh by transactions 25 times in a row | एटीएममध्ये छेडछाड; दोघांनी एकापाठोपाठ २५ वेळा ट्रान्झेक्शन करत काढले ५ लाख

एटीएममध्ये छेडछाड; दोघांनी एकापाठोपाठ २५ वेळा ट्रान्झेक्शन करत काढले ५ लाख

पुणे : फर्ग्युसन कॉलेज रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये छेडछाड करुन दोघांनी ५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना स्रेहा सेंटर येथील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये १८ मार्च रोजी  सायंकाळी साडेसात वाजता घडली. 

कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एक चोरटा आला. त्याने बॅगेमधून काही तरी काढून एटीएम मशिनच्या पाठीमागे गेला. त्याच्या सहाय्याने एटीएम मशीनमध्ये काही तरी छेडछाड करुन त्याने एकापाठोपाठ ५ वेळा ट्रान्झेक्शन करुन १ लाख रुपये काढले. त्यानंतर काही वेळानंतर त्याच एटीएम सेंटरमधून एका महिलेने २० वेळा ट्रान्झेक्शन करुन ४ लाख रुपये काढले. अशा प्रकारे दोघांनी ५ लाख रुपये काढून फसवणूक केली आहे.

एटीएम सेंटरला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्ये कैद झाली आहेत. त्यावरुन शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Tampering with ATMs; The two person stolen 5 lakh by transactions 25 times in a row