शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तेल्याभुत्याच्या कावडीची उभारणी

By admin | Updated: March 28, 2017 23:48 IST

दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी शेकडो वर्षांच्या

खळद : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पायी वारीने जाण्यासाठी पंचक्रोशीच्या संत तेल्याभुत्याच्या कावडीची आज गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी संत निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली एखतपूर येथे उभारणी करण्यात आली.खळद, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीची संत तेल्याभुत्याची कावड परंपरेनुसार शिखर शिंगणापूर यात्रेसाठी पायी वारीने रामनवमीच्या दिवशी प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने आज गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत कावडीची उभारणी करण्यात आली. या वेळी कावडीची एखतपूर-मुंजवडी येथे रंगाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात भव्य ग्राममिरवणूक काढण्यात आली. यानंतर येथील भैरवनाथ मंदिरात पंचक्रोशीच्या भाविकांची बैठक झाली. या वेळी पायी वारीबाबत सातारा व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिखर शिंगणापूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीचा वृत्तांत एखतपूर मुंजवडीचे माजी सरपंच रामभाऊ झुरंगे, माजी उपसभापती देविदास कामथे यांनी सांगितला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, नीरा बाजार समितीचे सभापती नंदकुमार जगताप, जोगवडीकर ग्रामस्थ यांनी भेट दिली.या वेळी जि. प. सदस्य दत्ता झुरंगे, खळदचे माजी सरपंच कैलास कामथे यांनीही मार्गदर्शन करीत यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. यंदा यात्रेत कावडीची जबाबदारी खळद गावावर असून कावडीची सेवा करण्यासाठी १४ बैलगाडीधारकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये येथील आबासो कृष्णा कामथे यांच्या बैलगाडीला कावडीची सेवा करण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते करण्यात आला. आजपासून भाविक यात्रेच्या तयारीला लागतात. यादरम्यान आपल्या बैलगाड्यांना दट्या बसविणे, त्यावर यात्राकाळात पुरेल एवढी वैरण बांधणे, बैलांच्या पायाला पत्रा बसविणे, वाहनांना पाण्याच्या टाक्या बसविणे, यात्रेदरम्यान जेवणाची व्यवस्था करणे आदी कामे करतात.रामनवमीच्या पूर्वसंध्येला संत तेल्याभुत्याच्या जळत्या घराच्या जागेला, तेलाच्या घाण्याला कावड भव्य मिरवणुकीने प्रदक्षिणा घालते व पुन्हा येथे पंचक्रोशीची बैठक होऊन तयारीचा आढावा घेतला जातो. रामनवमीच्या दिवशी ४ एप्रिल रोजी सायं. चार वाजता एखतपूर येथे समाधीस्थळाला प्रदक्षिणा घालीत खळद येथे शाही मिरवणुकीने कावड प्रस्थान करील.(वार्ताहर)