शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पायरेटेड पुस्तकांची विक्री करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:56 IST

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची मागणी : मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र

ठळक मुद्देमराठीतील गाजलेली पुस्तके निकृष्ट दर्जाच्या कागदावर छापून त्याची मोठया शहरात विक्री

पुणे : दिवसेंदिवस राज्यातील पायरेटेड पुस्तकांचा व्यवसाय आणि विक्री करणा-यांची संख्या वाढत असून लेखक, प्रकाशकांना आणि मराठी साहित्य व्यवहाराला फटका बसत आहे. ही संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवण्यात आले आहे.

पायरेटेड पुस्तकांचे व्यावसायिक मराठीतील गाजलेली पुस्तके निकृष्ट दर्जाच्या कागदावर छापून त्याची विक्री मोठया शहरात रस्त्यावर आणि पदपथांवर खुलेआम करत आहेत. लेखक, प्रकाशकांबरोबर वाचकांचीही ही फसवणूकच आहे. कारण निकृष्ट निर्मितीमुळे ही पुस्तके लवकर खराब होतात. कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे लागलेली टाळेबंदी, ठप्प झालेला साहित्य व्यवहार, ग्रंथालयांचे थकलेले अनुदान, थांबलेली पुस्तक खरेदी, बंद पडलेली ग्रंथ प्रदर्शने यामुळे प्रकाशक, ग्रंथवितरक आणि ग्रंथविक्रेते यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पायरेटेड पुस्तकांच्या व्यवसायामुळे त्यांच्या आर्थिक नुकसानीत भरच पडत आहे. लेखकांचे  आणि त्यांच्या पुढच्या पिढयांचेही रॉयल्टीच्या रकमेत घट झाल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

गेल्या काही दिवसात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे  मराठीतील महत्वाच्या आणि गाजलेल्या पुस्तकांच्या पीडीएफ अनेक समूहांवर लेखक आणि प्रकाशकांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. असे बेकायदेशीर कृत्य करणा-यांचा शोध घेणेही गरजेचे आहे. पायरेटेड पुस्तकांचा व्यवसाय आणि विक्री करणा-या संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वाचकांनीही अशा पुस्तक विक्रेत्यांपासून सावध राहून स्वत:ची फसवणूक टाळावी, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील