शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

थंड घ्या; पण पाणी मागू नका !

By admin | Updated: October 27, 2015 01:14 IST

रोजच्या कामासाठी नियमितपणे येणारे सुमारे २ हजार कर्मचारी आणि अधिकारी, तर या ना त्या कामानिमित्त या कार्यालयात दररोज येणारे तेवढेच कर्मचारी

पुणे : रोजच्या कामासाठी नियमितपणे येणारे सुमारे २ हजार कर्मचारी आणि अधिकारी, तर या ना त्या कामानिमित्त या कार्यालयात दररोज येणारे तेवढेच कर्मचारी; मात्र त्यांना प्यायला पाणीच नाही. तर एखादी व्यक्ती आली आणि तिने पाणी मागितले तर समोरचा नम्रपणे सांगतो, ‘साहेब थंड देतो, पण पाणी नका मागू.’ ही सत्यस्थिती आहे तब्बल १६०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या पीएमपीच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयाची. महापालिकेकडून शहरात दिवसाआड पाणी देण्यात येत असल्याने तसेच या कार्यालयात पिण्याचे पाणी साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे या ठिकाणचे कर्मचारी पाणी बंद असलेल्या दिवशी पाण्याच्या बाटल्या भरून आणण्यासाठी परिसरात वणवण फिरताना दिसतात.महापालिकेकडून पीएमपीसाठी दररोज पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, हे पाणी साठवून ठेवण्यासाठी पीएमपीकडे स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे महापालिकेकडून पुरविण्यात आलेले पाणी या कर्मचाऱ्यांना एकच दिवस मिळते. तर दुसऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी परिसरात हॉटेल तसेच इतर शासकीय कार्यालयांचा आधार घ्यावा लागतो. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या दुसऱ्या दिवशी पाण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वणवण करावी लागते. हीच स्थिती अधिकारी कार्यालयाचीही आहे. काही ठरावीक अधिकारी वगळता इतर अधिकाऱ्यांनाही पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे हे अधिकारीही कार्यालयात पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतात. मात्र, हे पाणी संपल्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाला, एक वेळ थंड मागा देतो; मात्र पाणी मागू नका, असा आग्रह अभ्यंगतांना करण्याची वेळ येत असल्याचे हे अधिकारी सांगतात.