गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे महापौरांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:26 IST2026-03-13T12:25:12+5:302026-03-13T12:26:10+5:30
शहरातील सुमारे ८५ टक्के सिलिंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून, गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे महापौरांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना
पुणे : शहरात गॅस सिलिंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कडक कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रशासनाला दिल्या.
गॅस पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेताना त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहरातील परिस्थितीची माहिती घेतली. महापौर नागपुरे यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार पुणे शहरात गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असून, दररोज सुमारे दहा हजार सिलिंडरचे वितरण नियमितपणे करण्यात येत आहे. शहरातील सुमारे ८५ टक्के सिलिंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून, गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे. गॅस वितरण कंपन्यांच्या समन्वयातून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घाबरून जाऊन सिलिंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही नागपुरे यांनी केले.