पुणे : शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीस पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पकडले. त्याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात तडीपार आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक कांबळे (वय २९, रा. मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस उप निरीक्षक मनोज अभंग, पोलिस अंमलदार अजित शिंदे, किरण कदम, पंकज देशमुख, श्रीकांत पिंगळे, ऋषीकेश दिघे व लक्ष्मीकांत कांबळे हे कोंबिंग ऑपरेशन करत होते. यादरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}