शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’चा विळखा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:50 IST

अकोला : संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराचे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, त्यांच्यावर शहरातील दोन  खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूने जिल्हय़ात मार्च महिन्यापासून आतापर्यंत २0 जणांचे बळी घेतले आहेत. 

ठळक मुद्देआणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले   खासगी रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घालणार्‍या स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराचे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, त्यांच्यावर शहरातील दोन  खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५ वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूने जिल्हय़ात मार्च महिन्यापासून आतापर्यंत २0 जणांचे बळी घेतले आहेत. स्वाइन फ्लू हा आजार  श्‍वसन यंत्रणेशी संबंधित असून, तो  एच १ एन १ या अत्यंत घातक विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसर्‍याला या आजाराची लागण होते. या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याच्या थुंकीमधून होतो. अकोल्यात यावर्षी मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तेव्हापासून या आजाराने डोके वर काढले आहे. गत दोन दिवसांपूर्वी शहरातील दोन खासगी इस्पितळांमध्ये एक महिला व दोन पुरुष, अशा तिघांना स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यानंतर दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वॉबचे नमुने पॉझिटीव्ह आले असून, त्यांच्यावर टॅमी फ्लू उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८५ वरमार्च ते सप्टेंबर २0१७ या कालावधीत १५0 संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ८५ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ६२ रुग्ण एक तर बरे झाले आहेत किंवा त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.