शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

By admin | Updated: April 16, 2017 04:01 IST

गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी शहरात स्वाइन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी शहरात स्वाइन फ्लूने दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये ५५ वर्षीय आणि ३१ वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३५ वर पोहोचली आहे.हडपसर येथील ५५ वर्षीय महिलेला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील स्रावाचे नमुने २३ मार्चला तपासणीसाठी पाठवल्यानंतर दुस-या दिवशी स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. महिलेवर उपचार सुरु असताना १४ एप्रिलला मृत्यू झाला. किरकटवाडी येथील ३१ वर्षीय महिलेला २७ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर २९ मार्चला स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. महिलेमध्ये न्युमोनियाचेही निदान झाले होते. उपचारांदरम्यान १५ एप्रिल रोजी महिलेचा मृत्यू झाला.शहरात जानेवारी महिन्यापासून २१२ रुग्णांची नोंद झाली असून, ३५ रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी गेला. १३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या स्वाईन फ्लूचे ४१ रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील २२ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसत आहे.(प्रतिनिधी)