स्वाइन फ्लूने वृद्धाचा मृत्यू

By Admin | Updated: January 30, 2015 03:35 IST2015-01-30T03:35:40+5:302015-01-30T03:35:40+5:30

शहरातील स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील चास गावातील ५० वर्षीय नागरिकाचा बुधवारी दुपारी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात मृत्यू

Swine Flu death death | स्वाइन फ्लूने वृद्धाचा मृत्यू

स्वाइन फ्लूने वृद्धाचा मृत्यू

पुणे : शहरातील स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील चास गावातील ५० वर्षीय नागरिकाचा बुधवारी दुपारी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. या महिन्यातील स्वाईन फ्लूचा हा सहावा मृत्यू आहे. शेषराव रामभाऊ गोंधळ असे या रूग्णाचे नाव असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गोंधळ यांना १६ जानेवारीपासून थंडी, ताप तसेच सर्दीचा त्रास होत होता. मात्र, त्रास मोठया प्रमाणात होत असल्याने त्या दिवशीच नगर येथील खासगी रूग्णालयात गोंधळ उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्रास आणखी वाढू लागल्याने त्यांना २२ जानेवारीला पुण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर २३ जानेवारीला त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचा
अहवाल प्राप्त झाला. आज सकाळी निधन झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Swine Flu death death