शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे तरणतलाव बंद

By admin | Updated: June 9, 2014 05:16 IST

खराब दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे प्राधिकरण, निगडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज, मोहननगर, चिंचवडच्या राजर्षी शाहूमहाराज आणि सांगवी येथील शितोळे सार्वजनिक तलाव आज बंद ठेवण्यात आले

पिंपरी : खराब दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे प्राधिकरण, निगडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज, मोहननगर, चिंचवडच्या राजर्षी शाहूमहाराज आणि सांगवी येथील शितोळे सार्वजनिक तलाव आज बंद ठेवण्यात आले. घाण पाण्यामुळे नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. यामुळे नियमित पोहणारे व पासधारकांची गैरसोय झाली. काल शनिवारपासूनच तलावाचे पाणी खराब झाले होते. त्यातून दुर्गंध येत असल्याने नागरिकांना पोहताना पाण्याचा त्रास होऊ लागला. याबाबत तलाव व्यवस्थापकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. तिकीट काढूनही शुद्ध पाणी पुरविले जात नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. ओरड सुरू केली. त्यामुळे काही तलाव काल दुपारनंतर बंद ठेवण्यात आले. आज साप्ताहिक सुटीच्या दिवशी या तिन्ही तलावांना टाळे होते. खराब पाण्यामुळे अनेकांना उलटी, तसेच त्वचेला खाज सुटण्याचा त्रास झाला. विशेषत: लहान मुलांना तो अधिक जाणवला.प्रवेशद्वावरील तलाव बंदचा फलक पाहून अनेकांना माघारी फिरावे लागले. पासधारकांनी या मनस्तापाचा त्रागा केला. खराब पाण्यामुळे वारंवार तलाव बंद ठेवले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली. गेल्या रविवारी तर दहापैकी केवळ एकच तलाव सुरू होता. या कारभाराबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.तलावाचे पाणी शुद्धिकरण यंत्रणेचे काम ठेका पद्धतीने सुरू आहे. ठेकेदाराचे कर्मचारी योग्य पद्धतीने काम करीत असल्याने पाणी खराब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, वीज खंडित झाल्याने पाणी शुद्धिकरणास अडथळा येतो. (प्रतिनिधी)